19 September 2020

News Flash

सिंधुदुर्ग पोलीस भरतीत ६७५ उमेदवारांची परीक्षेसाठी निवड यादी

सिंधुदुर्ग पोलीस भरतीत ६७५ उमेदवारांची परीक्षेसाठी निवड यादी तयार करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग पोलीस भरतीत ६७५ उमेदवारांची परीक्षेसाठी निवड यादी तयार करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग पोलीस भरती २९ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान पोलीस भरतीतील शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३८३० उमेदवारांनी आवेदनपत्रे ऑनलाइन सादर केली होती. यापैकी १४५४ उमेदवारांना ५० व ५० पेक्षा जास्त गुण प्राप्त झाल्याने ते शारीरिक चाचणीत उत्तीर्ण ठरले. सदर उमेदवारांमधून आरक्षण आणि गुणवत्ता यादीच्या आधारे लेखी परीक्षेकरिता ६७५ उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात आली आहे.
गुणवत्ता यादी तयार करताना कट ऑफ गुण पुढीलप्रमाणे- खुला प्रवर्ग सर्वसाधारण ८०, महिला ५०, खेळाडू ६२, प्रकल्पग्रस्त ५२, माजी सैनिक ६०, पोलीस पाल्य ८०, गृहरक्षक दल ६४, अ-जाती सर्वसाधारण ५६, महिला ५६, अ-जमाती सर्वसाधारण ६६, महिला ६४, विमुक्त जाती अ- सर्वसाधारण ७६, भटक्या जमाती व सर्वसाधारण ७४. भटक्या जमाती क- सर्वसाधारण ७२, भटक्या जमाती ड- सर्वसाधारण ७२, विशेष मागास वर्ग सर्वसाधारण ७२, इतर मागासवर्ग सर्वसाधारण ६५, महिला ५०, माजी सैनिक ६५ असा समावेश आहे. या उमेदवारांची लेखी परीक्षा १५ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग नगरी येथे घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग पोलीस भरतीतील गर्दी पाहता निवड यादी बनविणाऱ्या यंत्रणेला बारकाईने यादी बनविणे भाग पडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:14 am

Web Title: sindhudurg police bharti 2016
Next Stories
1 ‘लोकसत्तामुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ’
2 लातूरकरांचे भगीरथ प्रयत्न
3 मेळघाट, नंदूरबारमध्ये वर्षभरात ३१२ बालमृत्यू
Just Now!
X