News Flash

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ अपघात

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ अपघात झाला आहे. इंदापूरजवळ पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती असून सुदैवाने या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. पण त्यांचा चालक या अपघातात गंभीर जखमी असल्याचं समजतंय.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष हा निवडणूक लढविण्याची तयारी करतोय. त्याच निमित्तानं काल ते आपल्या गावी निघाले होते. रात्री दोनच्या सुमारास इंदापूरजवळ वरकुटे येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. आनंद शिंदे यांच्या गाडीच्या चालकाला पुढे जाणारा डंपर दिसला नाही आणि त्यांच्या गाडीने डंपरला पाठीमागून धडक दिली. या अपघातातून आनंद शिंदे थोडक्यात बचावले आहेत, पण  गाडीचं मात्र मोठं नुकसान झालंय. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, तर चालक गंभीर जखमी आहे. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 9:29 am

Web Title: singer anand shinde accident near indapur sas 89
Next Stories
1 सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार; शिवसेनेने रोखला जानकरांवर बाण!
2 बँक घोटाळा : शरद पवारांवरही गुन्हा दाखल होणार?
3 पापलेट जाळय़ात गावेना!
Just Now!
X