News Flash

एमपीएससी परीक्षांसाठी एकच ओळखपत्र पुरेसे

आयोगाच्या या निर्णयाने हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. 

( संग्रहीत छायाचित्र )

बायोमेट्रिक पडताळणी करण्याचा आयोगाचा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांवेळी दोन ओळखपत्रे दाखवण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे. आता बायोमेट्रिक पडताळणी सुरू करण्यात आल्याने उमेदवारांना परीक्षेवेळी एकच ओळखपत्र दाखवणे पुरेसे ठरणार आहे. आयोगाच्या या निर्णयाने हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

एमपीएससी परीक्षांना डमी विद्यार्थी बसवून काही उमेदवार अधिकारी झाल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर उमेदवारांना परीक्षेसाठी दोन ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले होते. पॅन कार्ड, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट असे पर्याय त्यासाठी देण्यात आले. मात्र, या निर्णयाने उमेदवारांना मनस्ताप झाला. आता हा निर्णय बदलून एकच ओळखपत्र दाखवणे पुरेसे ठरणार असल्याचे आयोगाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले.

नवीन निर्णयानुसार उमेदवारांनी नमूद केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र आणि त्याची छायांकित प्रत परीक्षेवेळी दाखवणे आवश्यक आहे. यातील कोणत्याही ओळखपत्राच्या मूळ प्रतीऐवजी साक्षांकित प्रत, छायांकित प्रत ग्राह्य़ धरली जाणार नाही. त्याशिवाय एमपीएससीच्या परीक्षांसाठी आता बायोमेट्रिक प्रणाली वापरली जाणार आहे. परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी, उमेदवारांची ओळख तपासण्यासाठी डिजिटल स्वरूपात बोटाचे ठसे किंवा बुबुळाच्या आधारे बायोमेट्रिक पडताळणी केली जाणार आहे, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 5:42 am

Web Title: single id proof for mpsc exams is enough
Next Stories
1 पिंपरी पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार आजपासून
2 गंमतघरातून विद्यार्थ्यांना शिक्षणप्रेरणा
3 कौटुंबिक न्यायालयातील पार्किंगचा तिढा कायम!
Just Now!
X