News Flash

सोलापुरात करोनाचे सहा बळी, पोलीस हवालदाराचाही मृत्यू

सोलापूरात करोनाबाधित मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे.

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असलेल्या सोलापुरात शुक्रवारी एकाच दिवशी एका करोनाबाधित पोलीस हवालदारासह सहा जणांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे. २८ नव्या रूग्णांची भर पडल्यामुळे एकूण रूग्णसंख्या ५१६ झाली आहे. मात्र यापैकी २२४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. आज आढळून आलेल्या नव्या २८ रूग्णांमध्ये एक पुरूष पंढरपूर तालुक्यातील उपरी या गावचा राहणारा आहे. तो मुंबईहून गावाकडे परत आला होता. त्यानंतर त्याला करोनाबाधा झाल्याचे आढळून आले.

आज शुक्रवारी एका महिलेसह सहा जणांचा करोनाने बळी घेतला. यातील बहुसंख्य मृत हे वृध्द आहेत. यात एक मृत (वय ६४) सांगोला तालुक्यातील पाचेगावचा राहणारा आहे. त्यास १८ मे रोजी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा २० मे रोजी मृत्यू झाला. वैद्यकीय चाचणीत त्याला करोनाची बाधा झाली होती, हे दिसून आले.

तर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस हवालदाराला (वय ४६) प्रकृती बिघडल्याने कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता काल गुरूवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय चाचणी अहवालानुसार त्याला करोनाची बाधा झाली होती. हुतात्मा कुर्बान हुसेन झोपडपट्टीत राहणाऱ्या एका पुरूषाचा (वय ५८) काल मृत्यू झाला. करोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

भवानी पेठेतील मराठा वस्तीत राहणाऱ्या ५८ वर्षाच्या वृध्द महिलेचाही करोनामुळे मृत्यू झाला. सलगर वस्तीतील एका ५६ वर्षीय पुरूषासह तेलंगी पाच्छा पेठेतील ७२ वर्षाच्या वृध्दाचा करोनामुळे बळी गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 8:54 pm

Web Title: six corona patients died in solapur including one police constable aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अमित ठाकरेंनी घेतली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट; केल्या महत्त्वाच्या सूचना
2 वर्धा : लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या ग्रामपंचायतींच्या मासिक सभा होणार पूर्ववत
3 महाराष्ट्रात नवे २९४० करोना रुग्ण, ६३ मृत्यू, संख्येने ओलांडला ४४ हजारांचा टप्पा
Just Now!
X