06 July 2020

News Flash

भीषण अपघातात सहा ठार, तीन जखमी

कन्नड तालुक्यातील मुरुमखेड गावाजवळ मालमोटार व स्कॉर्पिओमध्ये झालेल्या अपघातात सहा जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात एकाच

| April 6, 2015 01:20 am

कन्नड तालुक्यातील मुरुमखेड गावाजवळ मालमोटार व स्कॉर्पिओमध्ये झालेल्या अपघातात सहा जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा समावेश असून तीन महिला आणि एका दोन वर्षांच्या चिमुकलीचाही मृतांमध्ये समावेश आहे. धुळे-सोलापूर रस्त्यावर झालेल्या या अपघातातील जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 गोव्याहून परतणाऱ्या स्कॉर्पिओला (एमएच२०बीएन४०५५) धुळ्याहून औरंगाबादकडे येणाऱ्या मालमोटारीने जोराची धडक दिली. मालमोटारीच्या वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कन्नड शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरुमखेडाजवळ झालेल्या या अपघातातील जखमींना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी पोलिसांची बरीच दमछाक झाली. कारण अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील वाहतूक विस्कळीत झाली. अरुंद रस्त्यांमुळे झालेल्या या अपघातात कन्नड तालुक्यातील अधनेर येथील अफरोझखान संधूखान (वय ३५), निजामबी इसाक शेख (वय ६०), मुमताजबी निसार शेख (वय ६०), हकीम रफीक शेख (वय ४५), शाबीर नासीर शेख (वय ४५), सानिया रफीक शेख (वय २). या अपघातातून बचावलेल्या मुसा शेख, जावेद शेख व रिजवान शेख मुसा या तिघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून मुसा शेख इसाक यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. अति वेगामुळे हा अपघात झाल्याचे कन्नड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष भुजंग यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2015 1:20 am

Web Title: six died in road accident in aurangabad
टॅग Aurangabad
Next Stories
1 हॉटेलमध्ये कामासाठी छत्तीसगडमधून मुलींचे अपहरण
2 पत्रकारांना विमानवारी, साहित्यिक रेल्वेभरोसे
3 औरंगाबाद जिल्ह्यातील भीषण अपघातात सहा जण ठार
Just Now!
X