11 December 2017

News Flash

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना यापुढे नियुक्तीसाठी सहा महिन्यांचे प्रोबेशन

शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या संघटनेला परिविक्षाधीन कालावधीला सामोरे जावे लागण्याचा पायंडा अनुभवावा

प्रशांत देशमुख, वर्धा | Updated: February 5, 2013 4:17 AM

शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या संघटनेला परिविक्षाधीन कालावधीला सामोरे जावे लागण्याचा पायंडा अनुभवावा लागणार आहे. सेनेच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक फ क्त पहिल्या सहा महिन्यांसाठी केल्या जात असून या काळातील कामाच्या आधारेच पूर्णवेळ नियुक्ती व पदोन्नती लाभणार आहे.
शिवसेना अध्यक्ष यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेनेसाठी हा शिरस्ता सुरू झाला आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची राज्यातील जिल्हा कार्यकारिणी जाहीर करताना जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना सहा महिन्यांचेच नियुक्तीपत्र जारी केले आहे. या सहा महिन्यात प्रत्येक पदाधिकाऱ्यास आपले काम दाखवावे लागणार. संघटनेचे कार्यक्रम, राबविलेले उपक्रम, सदस्यनोंदणी, युवकांचे उपक्रम व सोडविलेले प्रष्टद्धr(२२४)्ना या अनुषंगाचे प्रत्येकाच्या कामाची तपासणी होईल. अपेक्षित जबाबदारीच्या कसोटीवर उतरणाऱ्या पदाधिकाऱ्यास पुढे पूर्णवेळ नेमणूक मिळेल. उत्कृष्ट कार्य करणाऱ्यासच पदोन्नतीचा लाभ होऊ शकेल. एकप्रकारे परिविक्षाधीन कालावधीचीच ही नेमणूक असल्याचे समजले जाते.  
युवासेनेच्या माध्यमातून शिवसेनेत नवा सळसळता राजकीय प्रवाह आणण्याचे उद्दिष्ट आहे. निष्ठावंतांकडे मुख्य संघटनेची जबाबदारी सोपवितानाच नवे प्रवाहही आवश्यक ठरल्याचे सेना नेते मानतात. पण पदापुरतेच पक्षात येणाऱ्या आगंतुकांना तावून-सुलाखून घेण्याचा विचारही यामागे आहे.  
वध्र्यात पहिला प्रयोग
युवा सेनेत जिल्हाध्यक्षाऐवजी जिल्हा संघटक व जिल्हा समन्वयक अशी दोन पदे निर्माण करण्यात आली असून वर्धा जिल्ह्य़ात नव्या चेहऱ्यांना प्रामुख्याने संधी मिळाली आहे. यानुसार जिल्हा संघटक-हेमंत दधिच, जिल्हा समन्वयक-राजू धंदोरिया, जिल्हा प्रवक्ता-अविनाश रोटकर अशी प्रमुख पदे आहेत. विधानसभा क्षेत्रनिहाय वर्धा संघटक-रवींद्र सौरंगपते, हिंगणघाट-नितीन सरोदे, देवळी-निरंजन दोणारकर व आर्वी योगेश गावंडे यांना नवी जबाबदारी मिळाली. यासह जिल्हयातील आठही तालुक्यातील एकूण ३५ पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली. यामधे अर्चना शर्मा, ज्योती हरणे, इंद्रायणी राऊत या युवतींचाही महत्वपूर्ण पदांवर समावेश आहे. आमदार दिवाकर रावते यांची नजर या नियुक्त्यांवर फि रली आहे. जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे यांच्या मार्गदर्शनात युवा सेनेचे कार्य चालणे अपेक्षित असले तरी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर परिविक्षाधीन कालावधीत तडफ  दाखविण्याची अंगभूत जबावदारी येऊन पडली आहे.  जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रथम सहा महिन्यापूरतीच नियुक्ती मिळाल्याची बाब खरी आहे. योग्य युवकांना संधी देण्यासोबतच त्यांना पक्षविचाराप्रमाणे घडविण्याचा हेतू आहे. पण, नियुक्ती कालावधीचा निर्णय शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याच विचाराने झाला. त्याबाबत अधिक भाष्य करता येणार नाही.

First Published on February 5, 2013 4:17 am

Web Title: six month probation for yuva sena members from now onwads