गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांची हेमंती कुलकर्णी यांच्या विरोधात आज न्यायालयात ३७ हजार पानांचे दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून २ हजार ४३ कोटीचा घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप ही सहा जण संशयित आहेत. त्या दृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तर हेमंती कुलकर्णी यांच्या बँक खात्यातून अधिक व्यवहार झाल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती गुंतवणूकदाराच्या फसवणूक प्रकरणी मागील दोन महिन्यापासून अटकेत आहेत.त्यांना जामीन मिळावा. यासाठी न्यायालयात अनेक वेळा अर्ज देखील करण्यात आला.मात्र प्रत्येक वेळी न्यायलायाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.या सर्व घडामोडी घडत असताना मागील आठवड्यात राज्य शासनाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. त्याच दरम्यान डीएसकेच्या जवळील सई वांजपे, केदार वांजपे आणि धनंजय पाचपोर यांना काल तर आज डीएसकेच्या फायनान्स विभागाचे विनयकुमार बाडगंडी यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना २५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुरुवारी न्यायालयात ३७ हजार पनांचे दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून २ हजार ४३ कोटीचा घोटाळा करण्यात आला आहे.या प्रकरणी अद्याप ही सहा जण संशयित आहेत.त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. डीएसके च्या जामीनाला आम्ही सुरुवातीपासून विरोध दर्शविला असून या पुढील काळात जामीना साठी अर्ज केल्यास आम्ही विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच त्यांनी जो पैसे परदेशात फिरवला असल्यास त्या दृष्टीने ईडी च्या माध्यमातून देखील तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.