01 March 2021

News Flash

अहेरीत पोलिसांना मोठे यश चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा

पोलीस आणि नक्षलींच्या चकमकीत आणखी ६ नक्षली ठार झाल्याची माहिती समोर

संग्रहित

अहेरी तालुक्यातील खांदला राजाराम जंगल परिसरात पोलीस आणि नक्षली यांच्यात चकमक झाली. यामध्ये ६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. गडचिरोली येथील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात पोलिसांनी सुमारे १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. ही घटना रविवारची असतानाच सोमवारी आणखी ६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात अभियान चालू केले आहे. हे अभियान सुरू असताना राजाराम खांदलाचे जंगलात नक्षलवादी व पोलिंसांमध्ये चकमक झाली, यात 6 नक्षलवादी ठार झाले. खात्मा झालेल्यांमध्ये अहेरी दलम कमांडर नंदू व सहकार्याचा समावेश आहे. इतर मृत नक्षलवाद्यांदी ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या कारवाईत मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. सर्व 6 मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून अहेरी येथे रात्री उशिरा आणले जाणार आहेत.

या भागात ग्रामस्थ आणि नक्षलींमध्ये वारंवार संघर्ष होत असल्याचे वृत्त येत असते. दरम्यान, देशात नक्षलवाद्यांच्या कुरापती कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर नक्षलवादी परिसर ही घटला आहे. देशातील १२६ जिल्हे नक्षलप्रभावीत होते. त्यातील ४४ जिल्हे हे नक्षलमुक्त झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु, आठ नवीन जिल्हे नक्षल प्रभावित झाल्याचेही समोर आले आहे. सर्वाधिक नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या घटून ३५ वरून ३० वर आली आहे.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 10:52 pm

Web Title: six naxalites killed in aheri
Next Stories
1 माझ्या वडिलांसोबत दारू का घेतोस? असा जाब विचारणाऱ्या तरुणाची हत्या
2 विरोधकांना एकत्र आणण्याबाबत शरद पवारांनी दिला काँग्रेसला हा सल्ला
3 दिल्लीचं माहीत नाही पण जनतेच्या मनातून भाजपा- शिवसेनेची पत उतरली: मुंडे
Just Now!
X