मुंबईहून आलेल्या व्यक्तीवर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर ते गूढ रित्या गायब झाले. हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याने रुकडी गावांमध्ये या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणातील सारे संदर्भ पाहता गोंधळ खूपच गोंधळ असल्याचे दिसत आहे.

मुंबई येथे राहणारे सात लोक इनोवा मोटारीतून हातकणंगले तालुक्यातील रुकडी या गावी आले हे. गाव खासदार धैर्यशील माने यांचे गाव म्हणून परिचित आहे. या गावात येण्यापूर्वी त्यांनी किनी टोलनाका तसेच गावाच्या चेकपोस्टवर केलेल्या नोंदी या वेगवेगळ्या असून त्या संशय वाढवणाऱ्या आहेत.  या लोकांनी आजारी व्यक्तीवर उपचार करण्यासाठी गावी जात असल्याचे अनेकांना सांगितले होते. ते रूकडीत आल्यानंतर आजारी व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर व्यक्ती मृत असल्याचे आढळले. या व्यक्तीचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह होता.

याची माहिती प्रशासन पोलिस यांना देण्यात आली. त्यांनी अनुमती दिल्यानंतर गावातील काही व्यक्तींनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान मृतदेह घेऊन येणाऱ्या व्यक्तींना संजय घोडावत कॉलेजच्या अलगीकरण केंद्रांमध्ये थांबवून ठेवण्यात आले होते. त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी सरपंच,उपसरपंच घेऊन आले. त्यांना सोडून ते परत आले. पुन्हा त्यांचा स्वॅब अहवालाची माहिती घेण्यासाठी चौकशी केली असता त्यांनी चाचणी न देताच पलायन केल्याचे आढळून आले. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. यामुळे या प्रकाराची चौकशी केली जावी. अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसत्ताशी बोलताना केली आहे.