15 July 2020

News Flash

पालघर पोलीस दलाला करोनाचा विळखा

सहा पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागण

प्रतिकात्मक छायाचित्र

सहा पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागण

वसई : सोमवारी वसई-विरार शहरांतील आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे पालघर जिल्ह्य़ातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता सहा झाली आहे.

सध्या करोनाचे संक्रमण वसई-विरार शहरांत वेगाने वाढत आहे. आता या करोनाचा शिरकाव पोलील दलातही झाला आहे. पालघर जिल्ह्य़ातील एकूण सहा पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. यापूर्वी एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लागण झाली होती. सोमवारी विरारमधील आणखी दोन पोलिसांना करोनाची लागण झाल्याचे उघड झाले. हे दोन्ही पोलीस वसईतून पालघर जिल्ह्य़ातील आपल्या निवासस्थानी ये-जा करत होते. करोनाच्या या वाढत्या संख्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

करोनाच्या काळात शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. अनेक पोलिसांना ये-जा करण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सतत बंदोबस्त आणि लोकांशी येणारा संपर्क यांमुळे पोलिसांना करोनाची लागण होत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 4:55 am

Web Title: six police officers and constable infected with corona in palghar zws 70
Next Stories
1 रासायनिक घनकचऱ्याच्या वाहतुकीला हिरवा कंदील?
2 वाडय़ात पाणीटंचाईच्या झळा
3 केटीनगरमध्ये नातेवाईकांकडे आलेल्या महिलेला करोना
Just Now!
X