News Flash

नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या सहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत १९ देश सहभागी झाले होते.

( संग्रहीत छायाचित्र )

दक्षिण कोरिया येथे २४ ते २९ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या सहा खेळाडूंनी सात सुवर्णपदके पटकावून विश्वविक्रम केला आहे. हे सर्व खेडाळू गडचिरोली येथे आले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत १९ देश सहभागी झाले होते. ३० सदस्यीय भारतीय चमूत  गडचिरोली जिल्हय़ातील सहा खेळाडूंचा सहभाग होता. यात एंजल देवकुले हिने दोन सुवर्णपदके तर, शेजल गद्देवर, रजत सेलोकरर, संदीप पेदापल्ली, अवंती गांगरेड्डीवार, यशराज सोमनानी यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावले.  हे सर्व खेडाळू गडचिरोली येथे आले असता आतषबाजी व वाद्याच्या गजरात खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. यावेळी सी.एम. चषक जिल्हा संयोजक अनिल तिडके, स्कूल ऑफ स्कॉलरचे प्राचार्य निखिल तुकदेवे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 3:23 am

Web Title: six students of naxal affected gadchirolis gold medal
Next Stories
1 शेतकऱ्यांना सावरण्यासाठी झेंडू खरेदीची चळवळ
2 ऐन दिवाळीत धान्य बाजारपेठेवर दुष्काळाची पडछाया
3 अनिल गोटे यांचे भाजपवरच दबावतंत्र?
Just Now!
X