News Flash

सोळावे बटण नकाराधिकाराचे!

महानगरपालिकेच्या निवडणुकीत अखेर मतदानातील नकाराधिकाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानयंत्रावरील शेवटचे सोळावे बटण नकाराधिकाराचे आहे.

| December 3, 2013 12:17 pm

महानगरपालिकेच्या निवडणुकीत अखेर मतदानातील नकाराधिकाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानयंत्रावरील शेवटचे सोळावे बटण नकाराधिकाराचे आहे. या बटणाची व्यवस्था केलेली मतदानयंत्रे आज रात्री उशिरा मनपाला मिळणार आहेत.   
दरम्यान, निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त नीला सत्यनारायण येत्या दि. ६ ला नगरच्या दौऱ्यावर येत आहेत. मनपा निवडणुकीच्या दृष्टीने शहरात त्यांचा हा दुसरा दौरा आहे.
मनपा निवडणूक आता प्रचाराच्या टप्प्यात आहे. यापूर्वी प्रभागरचनेच्या सुनावणीसाठी  सत्यनारायण नगरला आल्या होत्या. त्यांनीच ही सुनावणी घेतली होती. आता येत्या दि. ६ ला त्या नगरला येणार आहेत. निवडणूक व्यवस्थेची पाहणी करून त्याचा त्या आढावा घेतील. तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार व जिल्हा पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहराची कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी उद्याच (मंगळवार) सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय कुलकर्णी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  
शहरातील एक जागा बिनविरोध झाली असून उर्वरित ६७ जागांसाठी येत्या दि. १५ला मतदान होणार आहे. मनपा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदानासाठी मनपा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे ६०० यंत्रांची मागणी नोंदवली आहे. रचनेनुसार मनपाला ३५० मतदानयंत्रे पुरेशी आहेत. मात्र गरजेपेक्षा अधिक यंत्रांची मागणी करण्यात आली आहे. ही यंत्रे आज रात्री मनपाला मिळतील, सायंकाळी ती पुण्याहून नगरकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या यंत्रांमध्ये एकूण सोळा बटणे असून त्यातील शेवटचे म्हणजे सोळावे बटण नकाराधिकाराचे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयानुसार ही व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात ३४ प्रभागांत ६८ जागा आहेत. अ आणि ब याप्रमाणे प्रत्येकी दोन जागा असून, या दोन्ही उमेदवारांचे मतदान एकाच यंत्रात करता येईल अशी व्यवस्था या यंत्रांमध्ये करण्यात आली आहे.    
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 12:17 pm

Web Title: sixteen button for right to reject
Next Stories
1 काँग्रेस नगरसेवकांनी जबाबदारीने वागण्याचा पतंगरावांचा सल्ला
2 इंदापूरजवळील जैन मंदिरात साधूची निघृण हत्या
3 धुळे, नंदुरबार जिल्हा परिषदांवर काँग्रेसचा झेंडा
Just Now!
X