News Flash

…तर, सत्य बाहेर येणं महत्वाचं आहे – भुजबळ

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या निर्णयावर दिली प्रतिक्रिया

संग्रहित

महाविकासआघाडी सरकारने आज फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

“ जलयुक्त शिवार योजना मागील सरकारने आणली होती. या योजनेअंतर्गत नमूद करण्यात आलेली कामं झालेली नाही. असं कॅगच्या अहवालात सांगण्यात आलं होतं. तर, सत्य बाहेर येणं मह्त्वाचं आहे. असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

तर, या अगोदर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील महाविकासआघाडी सरकारच्या निर्णयाचे काँग्रेसच्यावतीने स्वागत केले.

“ फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून, राज्यात पाणीसाठा न वाढता फक्त काही कंत्राटदारांच्या पैशाचा साठा मात्र वाढला असल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला होता व यातील भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. त्यावर नुकत्याच आलेल्या कॅगच्या अहवालातही शिक्कामोर्तब करत गंभीर ताशेरे ओढले होते. महाविकास आघाडी सरकारने दखल घेत आज जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून काँग्रेस पक्ष याचे स्वागत करत आहे.” असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. शिवाय,‘मी लाभार्थी’ जाहिरातींचा खर्च भाजपाकडून वसूल करा, असं देखील सावंत यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 9:01 pm

Web Title: so it is important that truth comes out chhagan bhujbal msr 87
Next Stories
1 जलयुक्त शिवार योजनेच्या ‘एसआयटी’ चौकशीवरून सचिन सावंत यांचा भाजपावर निशाणा, म्हणाले…
2 महाराष्ट्रात १९ हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त, राज्याचा रिकव्हरी रेट ८४.७१ टक्के
3 निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात १० हजारांची वाढ, जाणून घ्या कॅबिनेटचे महत्त्वाचे निर्णय
Just Now!
X