सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मोबाइल क्रमांक रेल्वेच्या डब्यात लिहील्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ‘अंजली से खट्टी- मिठी बाते करो’, असा मजकूर असलेले पत्रक रेल्वेच्या डब्यात लावण्यात आले असून या पत्रकांवर दमानिया यांचा मोबाइल क्रमांकही लिहीण्यात आला आहे. या प्रकरणी दमानिया यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून या किळसवाण्या प्रकाराचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
अंजली दमानिया यांनी ट्विटरवर ट्विटकरुन या घटनेची माहिती दिली. या ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणतात, गेल्या तीन दिवसांपासून मला जळगाव, भुसावळ, गोरखपूर या भागांमधून अज्ञात व्यक्तींकडून फोनवरुन त्रास दिला जात आहे. राजकारणी किती खालच्या पातळीवर जातात, हे यावरुन स्पष्ट होते. अंजली दमानिया यांनी एक फोटो देखील ट्विट केला असून या फोटोत रेल्वेच्या डब्यात लावलेले पत्रक दिसत आहे. या पत्रकावर दमानिया यांच्या मोबाइल क्रमांक देण्यात आला असून ‘अंजली से खट्टी- मिठी बाते करो’, असे लिहीले आहे. अंजली दमानिया यांनी या प्रकरणी रेल्वे पोलीस तसेच मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
Receiving several calls from media asking for the action taken by police department on the harassment calls issue. I have filed an FIR with Vakola police station on 25th. Please speak to SPI Awhad at Vakola Police station or DCP Anil Kumbhare https://t.co/oYbkHUTk1v pic.twitter.com/yKqqRaNohw
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 28, 2018
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 12:40 pm