– वसंत मुंडे  
करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीत रस्ते सुमसान असून केवळ पोलीसच गस्तीवर आहेत.अशा परिस्थितीत रस्त्यावर फिरणा-या बेवारस मनोरूण्नावर उपासमारी ओढवल्याचे कळताच, बीडचे समाज कल्याण उपयुक्त सचिन मडावी यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शहरात फिरणाऱ्या तब्बल ६४ मनोरुग्णांना निवारा गृहात आनले. सलुनचे दुकाने बंद आणि संसंर्ग भितीने कोणी येत नसल्याने मडावी यांनी स्वतःच हातात कात्री घेऊन मनोरुग्णांचे वाढलेले केस कापून, स्वच्छता करून त्यांना निवारा ग्रहात दाखल केले. करोनाची लागण होऊ नये यासाठी प्रत्येक जण अंतर ठेवून आपली काळजी घेत असताना निराधार, मनोरुग्णांसाठी टाळेबंदीत समाजकल्याण विभागाच्या अधिकारी-यांतील माणुसकीने यंत्रणेतील मानवी चेहरा समोर आला.

बीड जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी चालू आहे. विषाणूंचा संसर्ग संपर्कातून होत असल्याने लोकांनी घरात कोंडून घेतले, बाजार बेठा बंद आणि रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. रस्त्यावर केवळ गस्तीवरील पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच दिसतात. सरकारने टाळे बंदीच्या काळात कोणाची उपासमार होऊ नये यासाठी सर्वसामान्य नागरिकांना धान्य आणि अनुदानही ही दिले आहे मात्र ज्यांची कुठेच नोंद नाही आणि केवळ दुकानदार हॉटेल चालक यांच्या आधारावर जीवन जगतात अशा बेवारस मनोरुग्णांनाकडे कोण लक्ष देणार.

वीस दिवसापासून हॉटेल बंद असल्याने या मनोरुग्णाची उपासमार होऊ नये यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना जीवनाची मदत सुरू केली होती तर सलून दुकाने बंद असल्याने या मनोरुग्णांचे डोक्यावरील केस वाढल्याने ते अधिकच गांगरून गेल्याचे दिसत होते. मात्र विषाणू संसर्गाच्या भीती व व संचारबंदी मुळे कोणीच या बेवारस लोकांचे केस कापण्यासाठी कोण येणार? त्यामुळे या बेवारस मनोरुग्णांच्या कठीण परिस्थिती माहिती समाज कल्याण उपायुक्त डॉक्टर सचिन मडावी यांना समजली मडावी यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या तब्बल 64 मनोरुग्णांना शोधले त्यांची वाढलेले केस स्वतः हातात कात्री घेऊन कापले त्यांची स्वच्छता करून त्यांना निवारा घरात दाखल केले.

प्रशासनातील प्रमुख अधिकारी पदावरील सचिन मडावी यांनी कठिन काळात मनोरूग्णासाठी केलेल्या कामाने प्रशासकीय यंत्रणेतील मानवी चेहरा च समोर आला. करोना जागतिक महामारी का संकटात माणसांमधील श्रीमंती गरीबी आणि उच्चनीचतेची सर्व संकल्पना गळून पडल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिवाची पर्वा न करता पोलीस आरोग्य कर्मचारी आणि माध्यमांचे प्रतिनिधी अहोरात्र काम करताहेत अशाही परिस्थितीत काही ठिकाणी मात्र चुकीचे अनुभव येत असताना सचिन मडावी यांनी मनोरुग्णांसाठी घेतलेला पुढाकार माणुसकीचे दर्शन घडणार आहे.