News Flash

मलवाडा पुलावर तात्पुरती मलमपट्टी

पुलावरील पदपथही बंद झाल्याने मलवाडा परिसरातील १० गावांचा संपर्क तुटला होता.

|| रमेश पाटील

 

पिंजाळ नदीच्या पुरामुळे पुलाचा अर्धा भाग वाहून गेल्याने मातीभराव

ऑगस्ट महिन्यात पिंजाळ नदीला आलेल्या पुरामुळे वाडा-जव्हार राज्य महामार्गावरील मलवाडा येथील पुलाचा एक भाग वाहून गेला. त्या ठिकाणी बंद असलेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मातीभराव टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. मात्र पाच महिन्यांनंतर या ठिकाणी कायमस्वरूपी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची शक्यता असून प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केलेले आहे.

४ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंजाळ नदीला पूर आला आणि त्यामुळे ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या मलवाडा पुलाचा एक भाग वाहून गेला. वाहून गेलेला हा भाग १८० फूट लांब, २५ फूट रुंद होता. एका बाजूला पूल वाहून गेल्या या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली.

पुलावरील पदपथही बंद झाल्याने मलवाडा परिसरातील १० गावांचा संपर्क तुटला होता. येथील नागरिकांची अडचण लक्षात घेता या ठिकाणी मातीभराव करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. गेल्या पाच महिन्यांत येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नाही. वाहनांच्या अतिभारामुळे मातीचा भराव दबत असून तो वाहून जाण्याची शक्यता आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात तर हा मार्गा पुन्हा बंद होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांनी केली आहे. शासनाने त्वरित कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. वाडा-जव्हार राज्य महामार्गावरील मलवाडा येथील पुलाचा एक भाग वाहून गेल्याने त्या ठिकाणी बंद असलेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मातीभराव टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. मात्र पाच महिन्यांनंतर या ठिकाणी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.

वाडा, विक्रमगड आणि जव्हार या तीन तालुक्यांना जोडणारा हा प्रमुख राज्यमार्ग आहे. प्रशासनाने तातडीने या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. – चंद्रकांत पाटील, सरपंच, मलवाडा

या पुलाची दुरुस्ती करताना मातीभरावाने न करता या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी तीन ते चार गाळे काढून त्यावर स्लॅब टाकावा. – कमलाकर पाटील, ग्रामस्थ, मलवाडा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:35 am

Web Title: soil erosion caused half of the bridge flooded by river floods akp 94
Next Stories
1 ‘सेट’ परीक्षा २८ जूनला
2 कोकण रेल्वेमार्गावर आज मेगा ब्लॉक
3 पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई, खडसेंना जे.पी. नड्डांचं आश्वासन