News Flash

दुर्दैवी! गॅस गळती झाल्याने पेटलं घर, सोलापुरात आईसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू

तृतीयपंथीयाची सरपंचपदी निवड झाल्यामुळे संपूर्ण गाव राज्यात प्रसिध्द झाले होते.

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथे स्वयंपाक घरातील गॅसची अचानक गळती होऊन आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण घर पेटले. या दुर्दैवी दुर्घटनेत आईसह दोघा मुलांचा होरपळून मृत्यूल झाला आहे. सोनाली ज्ञानेश्वर शिंदे (वय ३०) व तिची मुले सावळा (वय ७) आणि कृष्णा (वय ५) अशी दुर्दैवी मृत मायलेकांची नावे आहेत. या दुर्घटनेत मृत सोनाली हिचा पती ज्ञानेश्वर शिंदे हा किरकोळ भाजून जखमी झाला आहे.

अकलूजपासून जवळच असलेले तरंगफळ हे गाव ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कांबळे या तृतीयपंथीयाची सरपंचपदी निवड झाल्यामुळे संपूर्ण राज्यात प्रसिध्द झाले होते. याच गावात राहणाऱ्या ज्ञानेश्वर शिंदे यांच्या घरात सकाळी नेहमीप्रमाणे पत्नी सोनाली स्वयंपाक करीत होती. त्यावेळी अचानकपणे गॅस गळती होऊन आगीचा भडका उडाला आणि लगेचच संपूर्ण घर पेटले. त्यावेळी घरात सोनालीसह तिची दोन्ही मुले होती. तर पती ज्ञानेश्वर शिंदे घराबाहेर अंगणात होता. या दुर्घटनेत सोनाली व तिची दोन्ही मुले संपूर्णतः भाजून गंभीर जखमी झाली. नंतर थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 10:16 am

Web Title: solapur akluj gas cylinder three dead nck 90
Next Stories
1 Palghar zilla parishad : प्रतिनियुक्ती घोटाळा?
2 अंगणवाडी सेविका मानधन वाढीच्या प्रतीक्षेत
3 लग्नाचे आमिष दाखवून तरुणींचे शोषण
Just Now!
X