रस्त्यांवरील खड्डे सोलापूरमधील दुचाकीस्वार तरुणाच्या जिवावर बेतले आहे. खड्ड्यामुळे डम्परखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पोलीस मुख्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला असून रस्त्यालगतच्या मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताची घटना कैद झाली आहे.
सोलापुरातून अक्कलकोटकडे जाणारी जड वाहने शिवछत्रपती रंगभवन -पोटफाडी चौक- पोलीस मुख्यालयमार्गे जातात. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अशोक मंजूळकर (वय ४६) हे शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास या मार्गावरुन दुचाकीवरुन जात होते. पोटफाडी चौक ते पोलीस मुख्यालय यादरम्यान पाठीमागून डम्पर येत असतानाच मंजूळकर यांची दुचाकी रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात पडली आणि मंजूळकर हे डम्परच्या पाठीमागील चाकाखाली सापडले.
सोलापुरात पोलीस मुख्यालयाच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची वेळीच डागडुजी होत नाही. या रस्त्यावर म्हणजे अपघातस्थळासमोर असलेल्या एका मंगल कार्यालयामुळे रस्त्यावर गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 3, 2019 4:53 pm