News Flash

सोलापूर ग्रामिणमध्ये करोनाचा विस्तार, बार्शीतील रूग्णसंख्या शंभरीकडे

बार्शीच्या उपकारागृहात ११ नवे कैदी करोनाबाधित

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूरच्या जिल्हा कारागृहानंतर आता बार्शीच्या उपकारागृहात करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन त्यात ११ कच्चे कैदी बाधित झाले आहेत.  काल गुरूवारी सायंकाळपर्यंत बार्शी उपकारागृहातील एका कच्च्या कैद्याला करोनाने बाधित केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार या उपकारागृहातील आणखी १० कच्चे कैदी बाधित झाल्याचे आढळून आले. रात्री उशिरापर्यंत दिवसभरात बार्शी शहर व तालुक्यात ३४ बाधित रूग्ण सापडले. यात वैराग येथील दोघा रूग्णांचा मृत्यू झाला. बार्शीतील रूग्णसंख्या ९४ झाली आहे. तर मृतांचा आकडा चार झाला आहे. दरम्यान, सोलापूर शहरात काल रात्री ७१ बाधित रूग्णांची भर पडली आणि सहाजणांचा मृत्यू झाला.

यापूर्वी सोलापूर जिल्हा कारागृहात करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन त्यात ८४ कैदी आणि कर्मचारी बाधित झाले होते. यात एका कैद्याचा मृत्यू झाला होता. बाधित रूग्णांपैकी बहुतांशी रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आता बार्शीच्या उपकारागृहातही करोना विषाणूचा शिरकाव होऊन त्यात ११ कच्च्या कैद्यांना बाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 11:16 am

Web Title: solapur gramin corona viraus update barshi nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पनाच दिली जात नाही – उदयनराजे
2 भूमिपुत्रांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय
3 दुर्दैवी! गॅस गळती झाल्याने पेटलं घर, सोलापुरात आईसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू
Just Now!
X