19 November 2019

News Flash

सोलापुरातील बेपत्ता वकिलाची निर्घृण हत्या, पोत्यात भरले होते मृतदेहाचे तुकडे

पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत

सोलापुरात बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह आढळला असून खळबळ उडाली आहे. वकील राजेश कांबळे बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलीस तपास करत असताना त्यांना राजेश कांबळे यांचा मृतदेह आढळला. धक्कादायक म्हणजे राजेश कांबळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. मृतदेहाचे तुकडे एका पोत्यात भरुन ठेवण्यात आले होते. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

सोलापूर बार असोसिएशनने राजेश कांबळे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस आयुक्तालयात केली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलिसांना पांडुरंग वस्तीमधील एका बंद घरातून गेल्या पाच दिवसांपासून दुर्गंध येत असल्याची माहिती मिळाली. यावेळी जाऊन शोध घेतला असता एक पोतं आढळलं. या पोत्यात मृतदेहाचे तुकडे भरण्यात आले होते.

पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. राजेश कांबळे यांच्या कुटुंबीयांनी मृतदेहाचे तुकडे त्यांचेच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान पोलीस हत्या कोणी केली याचा तपास करत आहेत.

First Published on June 12, 2019 6:12 pm

Web Title: solapur missing advocate rajesh kamble dead body found in parts sgy 87
Just Now!
X