पोलिसांनी केलेल्या सूचनांनुसार सोलापूर महापालिकेत मजबूत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुरक्षा व्यवस्था करताना चक्क बाऊन्सर्सचीही मदत घेतली जात असताना त्यास नागरिकांसह लोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध झाला. बाऊन्सर्सच्या नेमणुका हाच मुळात चेष्टेचा विषय झाला असताना अखेर प्रशासनाने नमते घेत बाऊन्सर्सच्या नेमणुका रद्द केल्या. त्यांना परत पाठविण्यात आले आहे.

एकीकडे आर्थिकदृष्टय़ा संकटात असलेल्या महापालिकेत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करताना वार्षिक एक कोटी रुपयांचा जादा भार सोसावा लागणार आहे. सुरक्षा व्यवस्था  मजबूत करताना बाऊन्सर्सच्या नेमणुका करण्याची कल्पना प्रशासनाच्या डोक्यात अवतरली होती. त्यामुळे हा पालिकेच्या  वर्तुळात चेष्टेचा विषय झाला होता.

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Bank dispute in private building is in police case filed against Canara Bank management
खाजगी इमारतीतील बँकेचे भांडण पोलिसात, कॅनरा बँकेच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

गेल्या महिन्यात पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी महापालिकेच्या परिसराची पाहणी केल्यानंतर तेथील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार टप्प्या-टप्प्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. सुरूवातीला अचानकपणे महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. काही दिवसांनंतर पालिकेच्या आवारात दुचाकी व चार चाकी वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. वाहनांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय झटपट अमलात आणला गेला. पालिकेच्या आवारात प्रवेशबंदी केलेली वाहने शेजारच्या हुतात्मा स्मृतिमंदिराच्या वाहनतळाच्या जागेवर थांबविताना त्याठिकाणी ‘वाहनकोंडी’ होत आहे. दुसरीकडे हुतात्मा स्मृतिमंदिरात एखादा सांस्कृतिक वा मनोरंजनाचा कार्यक्रम असेल तर त्या वेळी वाहनांची गर्दी झाल्यास महापालिकेत कामासाठी आलेल्या नागरिकांना आपली वाहने कोठे उभी कराययी, असा सवाल उद्भवणार आहे.

मुख्य प्रवेशद्वार बंद करून वाहनांना सरसकट महापालिकेच्या आवारात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्याचे काम कमी आहे म्हणून की काय, आता महापालिकेतील कार्यालयांमध्ये चक्क बाऊन्सर्स तैनात करण्यात आले. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे व उपायुक्त त्र्यंबक डेंगळे-पाटील यांच्या दालनांसह महापौर शोभा बनशेट्टी व अन्य दालनांभोवती सुरक्षेसाठी बाऊन्सर्स उभे करण्यात आले आहेत. आतापर्यंत खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था पाहिली जात असताना आता बाऊन्सर्स तैनात  करण्याइतपत महापालिकेतील सुरक्षा व्यवस्था बिघडली आहे काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

बाऊन्सर्सची मदत घेण्यासाठी महापालिका म्हणजे काही डान्सबार नाही, अशा शब्दात नेटिझन्स मंडळींकडून प्रशासनाची खिल्ली उडविण्यात आली. पालिकेच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट असून पालिका कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिने वेतन मिळत नाही. गेल्या वर्षभरात विकासाची एक साधी वीटदेखील चढली नाही. पालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी गेल्या तब्बल नऊ महिन्यांपासून वेतन अदा झाले नसल्यामुळे संप पुकारला आहे.

महापालिकेच्या आवारासह शहरात विविध ठिकाणी असलेले जलकुंभ, स्मशानभूमी, दवाखाने आदी ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेपोटी खासगी तत्त्वावर ९६ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. महापालिकेच्या आवारात हे खासगी सुरक्षा रक्षक असतानासुध्दा काही मंडळींनी थेट मोर्चा किंवा अन्य मार्गाने पालिकेत येऊन कायदा हातात घेण्याचे कृत्य केल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यास सांगण्यात आले होते. यात ‘बाऊन्सर्स’ची मागणी नव्हती. परंतु कंत्राटदाराने कडक सुरक्षा व्यवस्थेपोटी  ‘बाऊन्सर्स’ तैनात केले होते. ते आता कमी करण्यात आले आहेत. 

– त्र्यंबक डेंगळे-पाटील, उपायुक्तसोलापूर महापालिका