News Flash

VIDEO: सोलापुरात मोठी कारवाई! अंत्यविधीला हजारोंची गर्दी, २०० जणांवर गुन्हा दाखल; ४५ जणांना अटक

पोलिसांनी परिसर केला सील

राज्यात एकीकडे करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन लावण्यात आलेला असताना सोलापुरात हजारोंच्या संख्येने जमाव जमल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. सोलापुरात सामाजिक कार्यकर्त्याच्या अंत्यदर्शनासाठी तुफान गर्दी उसळली होती. लॉकडाउन लावण्यात आलेला असतानाही इतक्या प्रमाणात झालेली गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. यानंतर सोलापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

महाराष्ट्राच्या करोना लढ्याला धक्का देणारं चित्र; सोलापुरात जमली हजारोंची गर्दी

सोलापुरातील लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर अंत्यदर्शनसाठी ही गर्दी जमली होती. सोलापूर पोलिसांनी यानंतर करण म्हेत्रे यांच्या घराचा एक किमीचा परिसर सील केला आहे. तसंच ४५ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची चाचणी केल्यानंतर एक व्यक्ती करोनाबाधित आढळला आहे.

आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग केल्यामुळे पोलिसांनी २०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील ४५ जणांना अटक करून रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यादरम्यान त्यांच्यातील एक जण करोना पॉझिटिव्ह आढळून आला. दरम्यान करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी करण म्हेत्रे यांच्या सोलापुरातील घराचा एक किमीचा परिसर बॅरिकेट्स लावून सील केला आहे.

यामध्ये लष्कर, सरस्वती चौक, ताशकंद चौक, शास्त्री नगर, सिद्धार्थ चौक, अलकुंटे चौकाचा समावेश आहे. पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान हीच तत्परता पोलीस आणि महापालिका प्रशासनाने आधी दाखवायला हवी होती अशी चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 2:42 pm

Web Title: solapur police booked 200 people over crowd in for final procession sgy 87
Next Stories
1 प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर ईडीचा छापा
2 फडणवीस व चंद्रकांत पाटलांनी ते व्हेंटिलेटर सुरू करून दाखवावेत; काँग्रेसचं आव्हान
3 महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाउन कायम?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर
Just Now!
X