सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस १ नोव्हेंबरपासून चार महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. हा निर्णय घेताना प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे साहजिकच प्रवाशांची गैरसोय होणार असून त्यांच्यासमोर वाहतुकीचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

सोलापूर-दौंड रेल्वेमार्गावर वाशिंबे ते जेऊर दरम्यान रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी येत्या १ नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी या दोन प्रवासी गाड्या संपूर्ण कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अन्य काही गाड्या ठराविक मार्गावर धावणार आहेत.

कल्याण स्थानकात प्रवाशांना ‘शिक्षा’

मध्य रेल्वेच्या सोलापूर-पुणे मार्गावर सोलापूर ते दौंडदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे कामांतर्गत वाशिंबे ते जेऊर मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी या मार्गावर येत्या १ नोव्हेंबरपासून सुमारे तीन महिन्यांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी ही दैनिक गाडी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी ही साप्ताहिक (तीन दिवस) गाडी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय पुणे-सोलापूर गाडीदेखील भिगवणपर्यंतच धावणार आहे. हैद्राबाद-पुणे एक्स्प्रेस पुण्याला न जाता कुर्डूवाडीपर्यंत धावणार आहे. तर पुणे-हैद्राबाद एक्स्प्रेसही पुण्याहून न सुटता कुर्डूवाडीपासून सुटणार आहे. अमरावती-पुणे ही आठवड्यातून दोनवेळा धावणारी गाडी संपूर्ण १२५ दिवसांच्या कालावधीत एक तास उशिरा धावणार आहे.

सिग्नलमध्ये बिघाड करुन महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा