18 January 2021

News Flash

धक्कादायक : सोलापुरात बाप लेकीच्या नात्याला काळीमा; मुलीवरच केला बलात्कार

तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या पित्याला ताब्यात घेतलं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सोलापुरात बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. पित्यानंच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चिमुरडीच्या आईनंच पोलिसांत याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

जन्मदात्या पित्यानंच आपल्या पोटच्या मुलीवर लैगिक अत्याचार केल्याची घटना सोलापुरातून समोर आली आहे. आपल्या पतीनंच मुलीवर लैगिक अत्याचार केल्याची तक्रार चिमुरडीच्या आईनं पोलिसांत दाखल केली आहे. तसंच गेल्या दोन वर्षांपासून आपला पती मुलीवर अत्याचार करत असल्याचंही तिच्या आईचं म्हणणं आहे. दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी रात्री घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत आपल्या पतीनं मुलीला उठवून तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

संबंधित प्रसंग कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत पित्यानं मुलीवर दोन वर्षे अत्याचार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या पित्याला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 11:34 am

Web Title: solapur rape case father allegedly rape on own daugher mother file a complaint in police station jud 87
Next Stories
1 सुनेचेच विवाहबाह्य संबंध होते; विद्या चव्हाण यांचा गौप्यस्फोट
2 मोदींचा सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय देशहिताचा, आम्ही स्वागत करतो -राष्ट्रवादी
3 हे सरकार कोण चालवत आहे?; मराठा आंदोलनावरून छत्रपती संभाजीराजे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
Just Now!
X