शासनाचा सामाजिक न्याय विभाग व नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंडची  (नॅब) सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८, २९ व ३० डिसेंबर रोजी अंध, अपंग मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या क्रीडा स्पधार्ंमध्ये राज्यातून सुमारे चार हजार अंध व अपंग खेळाडू सहभागी होणार आहेत. पार्क स्टेडिअम व नॉर्थकोट प्रशाला क्रीडांगणावर आयोजिलेल्या या क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन दि. १३ रोजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे व राज्यमंत्री सचिन अहिर हे उपस्थित राहणार आहेत. नॅबच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या क्रीडास्पर्धामध्ये अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, बहुविकलांग चा पाच प्रवर्गातील अपंग मुला-मुलींचा सहभाग राहणार असल्याचे यलगुलवार यांनी नमूद केले.

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
supreme court
केंद्र आणि राज्यात स्पर्धा चुकीची; कर्नाटकच्या केंद्रीय निधी याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
There are no sports events and cultural programs in Nagpur here is the reason
नागपुरात क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम नाही, जाणून घ्या कारण…
scam in milk supply
दूध आणि पोषण आहार पुरवठ्यात कोट्यवधींचा घोटाळा; आमदार रोहित पवार यांचा आरोप