02 March 2021

News Flash

सोलापूर: वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातला ट्रक; जागीच झाला मृत्यू

गृहराज्यमंत्री बोलवणार उच्चस्तरीय बैठक

सोलापूरमध्ये एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये वाहतूक पोलीस सागर चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, याची गंभीर दखल घेत याप्रकरणी उच्चस्तरीय बैठक बोलवणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, माढा तालुक्यातील वरवडे गावाजवळील टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. या ठिकाणी एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर चालकाने ट्रक घातला. यामध्ये वाहतूक पोलीस सागर चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालक नवनाथ बिबळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, ट्रक चालकावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगताना पोलिसांवरील हल्ल्यांसदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलावणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. अधिवेशन काळात यासंदर्भात आपण एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहोत. विशेषतः महामार्गावरील वाहतूक पोलिसांना आणि संबंधित सर्वच यंत्रणांबाबत या बैठकीत एकत्रीत चर्चा होईल, असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

चालक बेदरकारपणे महामार्गावर वाहनं चालवतात, यासाठी आत्ताच्या नियमांपेक्षा अधिक कडक नियम करणं आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम पहिल्यांदा, दुसऱ्यांदा मोडल्यास शिक्षा होते पण वारंवार जर हे झालं तर त्याचं लायसन्स रद्द करणं गरजेचं असल्याचंही देसाई यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 7:54 pm

Web Title: solapur truck hit by traffic police he died on the spot aau 85
Next Stories
1 “मिळालेला मंत्रीपदाचा तुकडा जपण्यासाठी बच्चू कडूंची लाचारी”
2 शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट; शेतकऱ्यांची मांडणार बाजू
3 प्रिय बाबासाहेब…!; जयंत पाटील यांनी पत्र लिहून महामानवाला केलं अनोख अभिवादन
Just Now!
X