28 February 2021

News Flash

तुळजाभवानी देवीस सोलापूरच्या भक्तांनी अर्पण केला २६ तोळ्याचा सोन्याचा हार

हे दान देणारे पाच व्यक्ती सोलापूरचे व्यापारी आहेत. आमची नावे प्रसिध्द केली जावू नयेत, अशी विनंती त्यांनी केली.

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीस सोलापूरच्या भक्तांनी २६ तोळे सोन्याचा हार गुरूवारी रात्री प्रक्षाळ पुजेपूर्वी अर्पण केला.

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीस सोलापूरच्या भक्तांनी २६ तोळे सोन्याचा हार गुरूवारी रात्री प्रक्षाळ पुजेपूर्वी अर्पण केला. आई राजा उदेऽ उदेऽऽच्या जयघोषात मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसिलदार राहूल पाटील यांच्याकडे हार सुपूर्द करण्यात आला. त्याची मंदिराच्या अभिलेखामध्ये रीतसर नोंद घेण्यात आली.

पाळीचे पुजारी वीरेंद्र कदम यांनी देवीस हार अर्पण केला. हे दान देणारे पाच व्यक्ती सोलापूरचे व्यापारी आहेत. देवीला सोन्याचा हार अर्पण केला असला तरी आमची नावे प्रसिध्द केली जावू नयेत, अशी विनंती त्यांनी केली. प्रशासनाच्यावतीने त्यांना देवीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तहसिलदार राहुल पाटील, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, महंत तुकोजीबुवा, पुजारी संजय सोंजी, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, पुजारी अतुल मलबा, सचिन परमेश्वर, शशिकांत कदम, विकास मलबा उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 5:40 pm

Web Title: solapurs devotee offerings 26 tola gold necklaces to tuljabhavani goddess
Next Stories
1 राधाकृष्ण विखे पाटील यांनाच अटक करा, सनातनची मागणी
2 Maharashtra Board HSC Exam Supplementary Result 2018: बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, २२.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3 विचित्र योगायोग! ९ वर्षांपूर्वी उद्घाटन केलेल्या स्मशानभूमीतच गुरुदास कामत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Just Now!
X