पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लष्करातील अधिकाऱ्यांचा त्रासाला आणि जाचाला कंटाळून मी राजीनामा देतो आहे असं चंदू चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चंदू चव्हाण यांनी डी. एम. रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.

Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

चंदू चव्हाण यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाली होती. दरम्यान त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून अनेक नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. मी लेखी स्वरुपात माझ्या वरिष्ठांकडे राजीनामा दिला आहे. मी माझ्या समस्या मागील तीन वर्षांपासून लेखी स्वरुपात दिल्या होत्या. मला पोस्ट हवी आहे आणि मला घरी जायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. मात्र आपलं ऐकून घेतलं जात नाही अशी तक्रार करत त्यांनी राजीनामा दिला आहे. चंदू चव्हाण हे पाकिस्तानच्या ताब्यात तीन महिने 21 दिवस होते. त्यावेळीही त्यांना त्रास सहन करावा लागला होता.

मी पाकिस्तानातून सुटून आल्यापासून माझ्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलला होता. पाकिस्तानातून आल्यापासून मला सतत त्रास दिला जात होता. शिक्षा दिल्याने माझे मानसिक खच्चीकरण झाले. मला न्याय मिळत नसल्याने मी त्रासाला कंटाळून राजीनामा देतो आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण करणार असे चंदू चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच त्यावेळी अशा गोष्टी बाहेर येतील ज्या कुणालाच ठाऊक नाहीत असे म्हणून त्यांनी त्यांचे निवेदन संपवलं आहे.

भारतीय लष्कराच्या पराक्रमी जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. जवानांच्या या पराक्रमामुळे लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. त्याचवेळी २९ सप्टेंबर २०१६ रोजी ‘३७ राष्ट्रीय रायफल्स’मध्ये तैनात असलेले जवान चंदू चव्हाण नजरचुकीने भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानात गेले. सुरुवातीला नकार देणाऱ्या पाकिस्तानने चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात असल्याचे नंतर सांगितले. अखेर २१ जानेवारी २०१६ रोजी चंदू चव्हाणची सुटका केली.