News Flash

गोळी लागून जवानाचा मृत्यू

येथील टेंबलाई कॅम्प परिसरात गोळी लागून एका जवानाचा मृत्यू झाला. दत्तात्रय रंगराव मोरे ( वय ३०, रा. मोरेवाडी, ता.पन्हाळा ) असे या मृत जवानाचे नाव

| May 22, 2014 03:23 am

येथील टेंबलाई कॅम्प परिसरात गोळी लागून एका जवानाचा मृत्यू झाला. दत्तात्रय रंगराव मोरे ( वय ३०, रा. मोरेवाडी, ता.पन्हाळा ) असे या मृत जवानाचे नाव आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
मोरे हा टेंबलाई मिलिटरी कॅम्प  टी.ए. बटालियनचा जवान आहे. सायंकाळच्या सुमारास मोरे डय़ुटीवर असताना गोळीचा आवाज झाला. यानंतर आसपासचे सर्व सहकारी त्याच्याकडे धावले त्यावेळी मोरे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.  गोळी त्याच्या छातीत लागली होती आणि त्याच्याकडे बंदोबस्तासाठी असलेली सíव्हस इन्सास रायफल त्याच्या शेजारी पडली होती. तातडीने इतर जवानांनी मिलिटरीच्या वाहनातून त्याना सीपीआरमध्ये दाखल केले. इस्पितळात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण रात्री साडेदहाच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र  छातीत लागलेली गोळी त्यानी स्वतवर झाडून घेतली की अपघात झाला हे अद्याप समजून आलेले नाही. याबाबत अति.पोलिस प्रमुख अंकित गोयल म्हणाले, घडलेल्या घटनेची चौकशी सुरू असून याचे नेमके कारण समजलेले नाही.  पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 3:23 am

Web Title: soldier died due to fire 2
Next Stories
1 ‘दोन रुपयां’वरून दोन खात्यांत जुंपली!
2 ऊस उत्पादकांनीच गद्दारी केली, मात्र दुष्काळी जनतेने मताधिक्य दिले- खोत
3 ऊस उत्पादकांनीच गद्दारी केली, मात्र दुष्काळी जनतेने मताधिक्य दिले- खोत
Just Now!
X