करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लोकल, मेल आणि एक्स्प्रेस सेवा बंद करण्यात आली होती. नंतर या निर्णयाला ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.  मात्र ही मुदतवाढ ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली हे वृत्त चुकीचं असल्याचं रेल्वेने म्हटलंय. मेल, एक्स्प्रेस आणि लोकल बंद राहणार हे वृत्त चुकीचं असल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.  करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाउन असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. ३० सप्टेंबरपर्यंत लोकल वाहतूक, मेल आणि एक्स्प्रेस बंद राहणार आहेत असं पत्रक आल्याचं काही प्रसारमाध्यमांनी सांगितलं. मात्र हे वृत्त चुकीचं आहे असं स्पष्टीकरण अशा प्रकारचं कोणतंही पत्रक काढण्यात आलेलं नाही असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

 

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनीही हे वृत्त चुकीचं आहे असं म्हटलंय.३० सप्टेंबरपर्यंत लोकल, मेल आणि एक्स्प्रेस बंद राहणार असं या पत्रकात म्हटलं होतं. मात्र या पत्रकाला काहीही अर्थ नाही असं म्हटलं आहे. सध्याच्या घडीला मुंबईत मर्यादित स्वरुपात लोकल सेवा सुरु आहे. मात्र या लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येत आहेत. लॉकडाउन आणि करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून लोकल, मेल आणि एक्स्प्रेस बंद करण्यात आल्या. मात्र स्थलांतरित मजुरांसाठी ट्रेन्स सोडण्यात आल्या. नंतर अत्यावश्यक सेवांसाठी लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.