News Flash

पैसे न दिल्याने वडिलांना मुलाकडून मारहाण

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची काही रक्कम गंगाराम भुमा आमेवाड यांच्या खात्यावर जमा झाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

शेतकरी सन्मान योजनेचे मिळालेले पैसे मला का देत नाही, असे म्हणत मुलाने आपल्या वडिलांना मारहाण केल्याची घटना हिमायतनगर तालुक्यातील धानोरा (ज.) येथे घडली.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची काही रक्कम गंगाराम भुमा आमेवाड यांच्या खात्यावर जमा झाली होती. ही रक्कम गंगाराम आमेवाड यांनी उचलली. आपल्या वडिलांनी त्यांच्या खात्यात जमा झालेले शेतकरी सन्मान योजनेचे पसे उचलल्याची माहिती त्यांच्या मुलास मिळाल्यानंतर त्याने पशासाठी तगादा लावला. वडील पैसे देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुलाने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत वयोवृध्द गंगाराम आमेवाड यांच्या हाताचे हाड मोडले. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 2:02 am

Web Title: son beating father for failing to pay abn 97
Next Stories
1 वृध्द सुरक्षा रक्षकाकडून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
2 दारूसाठी पैसे न दिल्याने सांगोल्यात प्राणघातक हल्ला
3 वेतन न मिळाल्यामुळे कामगाराची आत्महत्या
Just Now!
X