News Flash

मोबाइल घेऊन न दिल्याने वडिलांचा खून

मोबाइल विकत घेऊन दिला नाही म्हणून संतापलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडा मारून त्यांचा खून केल्याची घटना शहरातील वडाळा रस्त्यावर घडली.

| February 14, 2015 03:34 am

मोबाइल विकत घेऊन दिला नाही म्हणून संतापलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडा मारून त्यांचा खून केल्याची घटना शहरातील वडाळा रस्त्यावर घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटकही करण्यात आली आहे.

वडाळा रस्त्यावरील जेएमपी महाविद्यालयाजवळ सुरू असलेल्या रॉयल ड्रीम या संकुलाच्या बांधकामावर राजाराम रामेश्वरदास कुमार (६०) हे कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास होते. चंद्रकांत (२५) वडिलांसोबत या ठिकाणी काम करत होता. गुरुवारी सायंकाळी चंद्रकांतने वडिलांकडे भ्रमणध्वनी (मोबाइल) घेऊन द्या असा तगादा लावला. तथापि, आर्थिक स्थिती नसल्याने तो घेता येणार नसल्याचे वडिलांनी सांगितले. यामुळे संतापलेल्या चंद्रकांतने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने फटका मारला. अचानक झालेल्या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले. काही वेळानंतर चंद्रकांत आणि त्याच्या मित्रांनी जखमी अवस्थेतील राजाराम यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल करताना मुलाने ते बांधकाम सुरू असताना जखमी झाल्याचा बनाव रचला. तथापि, चंद्रकांतच्या संशयास्पद हालचालींवरून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर खरा प्रकार पुढे आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 3:34 am

Web Title: son kills father denying mobile phone in nashik
Next Stories
1 आता कृषी सहायक शेतकऱ्यांसाठी कायम उपलब्ध
2 ..तर मुंबईचे पाणी तोडू – पिचड
3 नगरकरांचे पुण्यातील उपोषण स्थगित
Just Now!
X