News Flash

लग्न करून देत नाही म्हणून आईची हत्या

मोहित विजयकुमार कायत (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर खून झालेल्या मातेचे नाव नागमणी (वय ५०) असे आहे.

संग्रहित छायाचित्र

लग्न करून  देत नाही म्हणून एका तरुणाने जन्मदात्या आईचा गळा आवळून हत्या केल्याची घटना सोलापूरमधील जोडभावी पेठेत घडली. या तरुणाने सकाळी आईचा खून केल्यानंतर स्वत: पोलिसात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली तेव्हा पोलीसही चक्रावून गेले.

मोहित विजयकुमार कायत (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर खून झालेल्या मातेचे नाव नागमणी (वय ५०) असे आहे. यासंदर्भात विजयकुमार मोतीलाल कायत (वय ५७) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कायत दाम्पत्याला रोहित व मोहित ही दोन मुले व प्रीती ही मुलगी आहे. थोरला मुलगा रोहित व मुलगी प्रीती हे विवाहित आहेत. तर धाकटा मुलगा मोहित याच्या लग्नासाठी स्थळ पाहणे सुरू होते. उदरनिर्वाहासाठी कायत कुटुंबीय पुण्यात वारजे-माळवाडी येथे राहतात. मोहित हा पुण्यात ‘फूड डिलेव्हरी’च्या कामासाठी जात होता. त्याला गांजा पिण्याचे व्यसन होते. मागील महिन्यापासून त्याने गांजाचे व्यसन सोडले होते. गेल्या ७ मे रोजी तो पुण्यातून सोलापुरात आल्यानंतर स्वत:ला मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून घरी परत आल्यानंतर रात्री घरात कायत कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. रात्री झोपी गेल्यानंतर पहाटे मोहित याने जन्मदात्या आईचा खून केल्याचे दिसून आले. स्वत:च्या लग्नासाठी तो आग्रही होता. परंतु लग्न करून देत नाही म्हणून त्याने आईबरोबर भांडण काढले. त्यात रागाच्या भरात त्याने आईचा गळफास देऊन खून केला. या घटनेनंतर तो स्वत: पोलिसात हजर होऊन घडलेला प्रकार सांगितला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 5:47 pm

Web Title: son kills mother over marriage in solapur
Next Stories
1 व्हॉट्स अॅेपवरील छायाचित्रे काढून टाकल्याने एकास मारहाण
2 अहमदनगर-कल्याण महामार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या 3 महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले
3 सुप्रिया सुळेंविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला चोप
Just Now!
X