28 May 2020

News Flash

‘बळीराजा नको करु आत्महत्या’ ही कविता सादर करणाऱ्या मुलाच्या वडिलांचीच आत्महत्या

पाथर्डी तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

(संग्रहित छायाचित्र)

शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये म्हणून तिसरीतल्या एका मुलाने एक कविता रचली. पण आपल्या आयुष्यात काय वाढून ठेवलं आहे हे त्या मुलाला कुठे ठाऊक होतं? ज्या मुलाने ही कविता वाचली त्याच्याच वडिलांनी संध्याकाळी विष प्राशन करुन आत्महत्या केली. पाथर्डी तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या ठिकाणी हनुमान नगर येथे तिसरीच्या वर्गात प्रशांत बटुळे हा विद्यार्थी शिकतो. बुधवारी प्रशांत बटुळेने आपल्या वर्गात एक कविता सादर केली. शेतकऱ्याने आत्महत्या करु नये म्हणून ही कविता त्याने रचली होती. मात्र त्याच रात्री त्याचे वडील मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली.

प्रशांतच्या कवितेतल्या काही ओळी

शेतात कष्ट करुनही तुझ्या डोक्याला ताप,
बळीराजा नको करु आत्महत्या..
पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरे,
कसे उन्हात करतात शेती, पिक उगवणी करुन मिळतात पैसे
शेती करुनही तुझ्या हाताला फोड
अरे बळीराजा नको करु आत्महत्या

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 7:58 pm

Web Title: son present poem on farmer suicide in school his father suicide on that evening in pathardi scj 81
Next Stories
1 मित्रासोबत मिळून वडिलांचा मुलावर अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपुरातील धक्कादायक घटना
2 ओबीसींच्या जातनिहाय जनणगनेसाठी सर्वपक्षीय नेते घेणार पंतप्रधानांची भेट-अजित पवार
3 मुंबईत जन्माला आलं सर्वात कमी वजनाचं बाळ
Just Now!
X