News Flash

Good News: मान्सूनची केरळ किनारपट्टीवर धडक, लवकरच महाराष्ट्रात येणार…

भारतात मान्सूनचं आगमन, केरळ किनारपट्टीवर धडक

संग्रहित (एक्स्प्रेस फोटो - निर्मल हरिंद्रन)

भारतात मान्सूनचं आगमन झालं असून केरळ किनारपट्टीवर धडक दिली आहे. भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात ७५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने ३० मे रोजी मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर केलं होतं. पण भारतीय हवामान खात्याने ही माहिती फेटाळली होती. अशी घोषणा करण्यासाठी सध्या योग्य परिस्थिती नसल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं होतं.

दरम्यान मुंबईत आज सकाळी पावसाने हजेरी लावल्याचं पहायला मिळालं. दुसरीकडे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने कोकणासह राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आणखी वाचा- पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान विभागाने याआधी १ जूनला संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली होती. तसंच २ जूनला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. ३ आणि ४ जूनला उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कोकणात इतर ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. विदर्भामध्येही विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांत पावसाचा इशारा –
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार प्रामुख्याने कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस वादळी पाऊस होईल. पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, परभणी आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसादरम्यान सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 12:46 pm

Web Title: southwest monsoon hits kerala sgy 87
Next Stories
1 महत्वाची बातमी : पेट्रोल, गॅस सिलेंडर, रेशनकार्ड, रेल्वेसंदर्भातील ‘हे’ नवीन नियम आजपासून लागू
2 अन् चोराने १५ दिवसांनी मालकाला परत केली चोरलेली बाईक, पोलीसही चक्रावले
3 उंचावरील युद्धासाठी चीनकडे टाइप १५ रणगाडा, Z-20 हेलिकॉप्टर, GJ-2 ड्रोन
Just Now!
X