News Flash

वाशीम जिल्ह्यात ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी

पिकास युरिया खताची मात्रा न देण्याचे आवाहन

फाइल फोटो

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : वाशीम जिल्ह्याात खरीप २०२० हंगामात झालेल्या पेरण्यापैकी ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आलेली आहे. सोयाबीन पीक हे कडधान्य वर्गातील असल्यामुळे झाडाच्या मुळावर गाठी असतात. या गाठीद्वारे हवेतील उपलब्ध असलेले ७८ टक्के नत्र शोषून घेऊन सोयाबीन पिकास उपलब्ध होते. त्यामुळे सोयाबीन पिकाला दुसरी मात्रा युरिया खताची देण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले.

काही शेतकऱ्यांची सोयाबीन पिकास पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी युरीया हे रासायनिक खत देतात, ही पद्धत चुकीची आहे. सोयाबीन पिकास युरिया खत दिल्यास कर्बनत्राचे प्रमाण विषम होऊन पिकाची कायीक वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे फुलधारणा व फळधारणा कमी होते. युरियावरील अनाठाई खर्च वाढतोच, सोबतच पिकाच्या उत्पाकदनात सुद्धा घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन तसेच इतर सर्व कडधान्य पिकामध्ये युरिया खताची दुसरी मात्रा देऊ नये. विद्याापीठाच्या शिफारशीनुसार शेंगा भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरिया किंवा दोन टक्के डीएपीची फवारणी केल्यास दाणे चांगले भरुन दाण्याच्या वजनामध्ये वाढ होते. त्यामुळे उदत्पादनातही वाढ होते, असे तोटावार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 9:59 pm

Web Title: soybean sowing on 75 percent area in washim district scj 81
Next Stories
1 धक्कादायक! शेतीच्या वादातून चुलत्याने केली दोन्ही पुतण्यांची खोऱ्याने ठेचून हत्या
2 साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरु होणार; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
3 सुखद बातमी, राज्यात आत्तापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण बरे होऊन घरी
Just Now!
X