27 February 2021

News Flash

गोवा राज्याच्या बनावट मद्य वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष तपासणी नाका

गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलीस एकमेकांकडे असले तरी असे गुन्हे रोखण्यासाठी काम करायचे आहे.

(संग्रहित छायाचित्र)

येणाऱ्या नववर्षांच्या स्वागताच्या निमित्त गोवा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या दारू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सरप्राईज तपासणी नाका उभारण्यात येणार आहे तशा सूचनाही पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या असून काळ्या काचा असणाऱ्या गाडय़ाची विशेष तपासणी केली जाणार असल्याची माहिती कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

आंबोली येथील गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी तेथे पोलीस ठाणे उभारण्यासाठी निधी उपलब्ध नसून कोवीडच्या पार्श्वभूमीवर जसा निधी उपलब्ध होईल. त्याप्रमाणे पुढील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यतील पोलीस ठाण्यांच्या वार्षिक तपासणी करतात श्री मोहिते जिल्ह्यात आले आहेत.  त्यांनी सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी आणि सावंतवाडी ठाण्याची तपासणी केली.

यावेळी  पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव आदी उपस्थित होते.

यावेळी श्री मोहिते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यच्या हद्दीवर असणाऱ्या गोवा राज्यातून पुणे , नाशिक, सोलापूर आधी भागामध्ये मोठय़ा प्रमाणात गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक होते. दारू रोखण्यासाठी यापुढे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या निगराणीखाली सरप्राईज पोलीस तपासणी नाका उभारण्यात येणार आहे.

नववर्षांच्या पार्श्वभूमीवर होणारी दारू वाहतूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तशा सूचनाही आपण दिल्या असून याठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्यांची डय़ुटी सरप्राईज रित्या समजणार आहे. दर आठतासांनी डय़ुटी बदलणार असून अचानक  डय़ुटी लावण्यात येणार आहे. गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलीस एकमेकांकडे असले तरी असे गुन्हे रोखण्यासाठी काम करायचे आहे. त्यामुळे यापुढे अवैद्य दारू वाहतूक त्यातून घडणारे गुन्हे मोडीत काढण्यासाठी यापुढे विशेष मोहीम घेतली जाणार आहे, असे ते म्हणाले.

गांजा चरस विक्री सारख्या गुन्हेगारीवर विशेष लक्ष देणार असून नजीकच्या गोवा राज्यातील कनेक्शन बाबत पुढे वेगळे टीम लक्ष ठेवून राहणार आहे, असे श्री. मोहीते म्हणाले.

शहरातील खुनी हल्लय़ामध्ये टेम्पो चालकाचा मृत्यप्रकरणी चंदन उर्फ सनी अनंत आडेलकर व अक्षय अजय भिके या दोन्ही आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची सूचना आपण अधिकाऱ्यांना दिली आहे, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 12:11 am

Web Title: special checkpoints to curb counterfeit liquor smuggling in goa abn 97
Next Stories
1 भाजपातील ७० टक्के आमदार राष्ट्रवादीचेच-छगन भुजबळ
2 राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ, बरं होणाऱ्यांचं प्रमाण घटलं
3 रायगड संवर्धनाचं काम ८ वर्षात पूर्ण होणार-संभाजीराजे
Just Now!
X