News Flash

गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी एसटी गाडय़ांची खास सुविधा

यंदा ८५२ फेऱ्यांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग आणि १ हजार ३४८ फेऱ्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी एस टी च्या जादा फेऱ्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नियोजनानुसार रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यंसाठी मुंबईहून बावीसशे, तर रत्नागिरीतून परतीसाठी तेराशे फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

येत्या २८ ऑगस्टपासून मुंबईहून जादा गाडय़ा सुटणार असून पहिल्या दिवशी ११ फेऱ्या, २९ ऑगस्टला ५२, ३० ऑगस्टटला ३७४, ३१ तारखेला सर्वाधिक १ हजार ४८५, तर गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी, १ सप्टेंबरला २७९ फेऱ्यांमधून चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. यंदा ८५२ फेऱ्यांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग आणि १ हजार ३४८ फेऱ्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे.

या व्यतिरिक्त रत्नागिरी एसटी विभागातून ५२ जादा फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. तसेच नियमित १५९ फेऱ्याही राहणार आहेत.

एसटीतर्फे कशेडी चेक पोस्ट, चिपळूण, शिवाजीनगर येथे क्रेन, गस्ती पथक कार्यरत राहणार आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरीमध्ये यांत्रिक कर्मचाऱ्यांची दुरुस्ती व्हॅन २४ तास उपलब्ध राहणार आहे. तसेच  माळनाका येथील विभागीय वाहतूक शाखेचा नियंत्रण कक्षही २४ तास चालू राहणार आहे. महामार्गावरील एसटीची सर्व उपहारगृहे २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

विसर्जनानंतर परतीच्या फेऱ्या

गौरी—गणपती विसर्जनानंनतर परतीच्या फेऱ्या सुरू होतील. गेल्या वर्षी या काळात तेराशे फेऱ्यांसाठी बुकिंग झाले होते. यंदा अकराशे फेऱ्या आरक्षणासाठी उपलब्ध असून ऑनलाइन आरक्षण सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:16 am

Web Title: special facilities for st vehicles at ganeshotsav abn 97
Next Stories
1 नदीजोड प्रकल्पाचे भिजत घोंगडे
2 सोपल यांच्या निर्णयाने सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला फटका
3 विलास तरे यांच्या सेना प्रवेशाने निष्ठावंत नाराज
Just Now!
X