19 February 2020

News Flash

पानसरे हत्या प्रकरण : पहाटे एसआयटीने तिघांना केली अटक

सकाळी अकरा वाजता त्यांना कोल्हापूर न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी एसआयटीने आणखी तिघांना ताब्यात घेतलं आहे. सचिन अंदुरेसह अन्य दोघांना एसआयटीने पुणे आणि मुंबईतून ताब्यात घेतले आहे. सकाळी अकरा वाजता त्यांना कोल्हापूर न्यायालयात हजर केले जाणार आहे. १६ फेब्रुवारी, २०१५ रोजी भाकपचे नेते व ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी गोळ्या झाडल्या, यामध्ये कॉ. पानसरे यांचा मृत्यू झाला.

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे याला पुण्यातील तुरूंगातून बेड्या ठोकल्या आहेत. अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले. तिघांच्या अटकेनंतर पानसरे हत्याप्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या बारा झाली आहे.

First Published on September 6, 2019 10:03 am

Web Title: special investigation team sit investigating govind pansare murder case has taken the three accused in custody nck 90
Next Stories
1 ऋतुराज पाटील विधानसभा लढणार – सतेज पाटील
2 कोल्हापूरात पुन्हा धारांचे तांडव, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
3 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर
Just Now!
X