21 September 2020

News Flash

पालघरमध्ये सहा दिवसांची विशेष टाळेबंदी

करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने निर्णय

संग्रहित

करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने निर्णय

पालघर : पालघर नगर परिषद हद्दीमध्ये करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने तसेच या कार्यक्षेत्रातील निकट सहवास अधिक प्रमाणात करोनाबाधित झाल्याचे आढळून आल्याने १४ ते १८ ऑगस्ट या सहा दिवसांसाठी शहरातील सर्व प्रकारच्या हालचालींवर र्निबध टाकणारे मनाई आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.

पालघर नगर परिषद क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४४२ रुग्णांना करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच पद्धतीने त्यांच्या निकट सहवासामध्ये या आजाराचा संसर्ग व प्रसार झालेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय असल्याने सहा दिवसांच्या कालावधीसाठी नगर परिषद क्षेत्रामध्ये हालचालींवर र्निबध आणण्यासाठी मनाई आदेश लागू केले आहेत. या दरम्यान शहरातील सर्व दुकाने, हॉटेल, औद्योगिक आस्थापने, उघडय़ावर भरणारा भाजीबाजार व मासळी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यांमधून औषधाची दुकाने तसेच दुग्धालय यांना वगळण्यात आले असून अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर वाहनांवर वाहतूक बंद ठेवण्याचे आणि इतर वाहनांना इंधन न देण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

अत्यावश्यक सेवेतील आस्थापने तसेच बँकांमध्ये टोकन पद्धतीचा अवलंब करून सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी या आदेशातून सवलत राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दंडाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी आदेशात नमूद केले आहे.

शहरात पोलीस बंदोबस्त

टाळेबंदीच्या काळादरम्यान पालघर शहरात आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे नगर परिषदेतर्फे सांगण्यात आले. शहरातील सार्वजनिक शौचालयामध्ये सोडियम हायड्रॉक्साइड फवाऱ्याच्या माध्यमातून र्निजतुकीकरण करणे, शहराच्या भागांमध्ये आरोग्य सर्वेक्षण हाती घेण्यासाठी नगर परिषद प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 1:21 am

Web Title: special lockdown for six days in palghar zws 70
Next Stories
1 विक्रमगड-मनोर रस्त्याची दैना कायम
2 अकरावी प्रवेशाचे ‘गणित’ किचकट
3 सामाजिक अंतराचे नियम धाब्यावर
Just Now!
X