News Flash

खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजनेतील हजार रुपये आदित्य ठाकरेंना द्या: धनंजय मुंडे

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. शुक्रवारी नाशिकला जात असताना घोटीजवळ त्यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटल्याचे वृत्त समोर आले होते.

संग्रहित छायाचित्र

नाशिक दौऱ्यावर गेलेले युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रेंजरोव्हर गाडीचा टायर खड्ड्यांमुळे फुटल्याची घटना समोर आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला चिमटा काढला आहे. राज्यातील खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजनेतील हजार रुपये आदित्य ठाकरे यांना द्यावे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. शुक्रवारी नाशिकला जात असताना घोटीजवळ त्यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटल्याचे वृत्त समोर आले होते. यामुळे आदित्य ठाकरेंना नाइलाजाने दुसऱ्या गाडीने हॉटेलला पोहोचावे लागले. खड्ड्यांमुळे टायर फुटल्याचे सांगितले जाते.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन सरकारवर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी हे पहावे, राज्यातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली असून खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजनेतले हजार रुपये आता मित्रपक्ष शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना पण पाठवावेत, असे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे दाखवा, बक्षीस मिळवा ही योजना जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी हा टोला लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 3:11 pm

Web Title: spot pothole get 1000 rs reward chandrakant patil aaditya thackeray dhananjay munde
Next Stories
1 अनैतिक संबंधात अडथळा, पतीने केली मुख्याध्यापक पत्नीची हत्या
2 रायगडमध्ये ‘शिवशाही’ला अपघात, ३१ प्रवासी जखमी
3 गणेशोत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारी नव्हे, पुणे महापालिकेने हटवला उल्लेख
Just Now!
X