१७१ शाळांनी निकालात शंभरी गाठली

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज बुधवारी जाहीर करण्यात आला. दहावी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के एवढा लागला आहे.

जिल्ह्यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण राज्यात सर्वाधिक सिंधुदुर्गात आहे. सिंधुर्गातील २२८ माध्यमिक शाळांपैकी १७१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत कोकण विभागाचा निकाल यंदा चक्क ७.६९ टक्कय़ांनी वाढला आहे. तरीही सलग नवव्यांदा सिंधुदुर्ग जिल्हा दहावी निकालात अव्वल राहिला आहे.

विद्यामंदिर कणकवलीची सिद्धी सुरेंद्र मोरे व श्रावणी राजेंद्र मणचेकर, कासार्डे हायस्कुलची मृण्मयी विजयानंद गायकवाड ,वरवडे येथील आयडिएल इंग्लिश स्कलची प्राची अनिल तायशेटे यांनी शंभर टक्के गुण मिळवत जिल्हयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.तर सावंतवाडी आरपीडीची राजवी डामरेकर हीने ९९.८० टक्के गुण मिळवून द्धितीय क्रमांक पटकावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १११८० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यातील ११ हजार ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विशेष गुणवत्ता यादीत ५,७०४ विद्यार्थ्यांना स्थान मिळाले. प्रथम श्रेणीत ३ हजार ८८०, द्वितीय श्रेणीत १३१० आणि पास श्रेणीमध्ये १६६ विद्यार्थी आहेत.

दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांांपेक्षा विद्यार्थिनीनी बाजी मारत आपण सरस असल्याचे दाखवून दिले आहे. या परिक्षेत ५७०२ विद्यार्थी तर५३५८ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांंची टक्केवारी ९८.६० तर विद्यार्थिनींची टक्केवारी ९९.२८ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंपेक्षा विद्यार्थिनीच सरस असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

गेली ९ वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा हा दहावीच्या परीक्षेत अव्वल राहिला आहे. यावर्षीही विद्याथ्र्र्यानी भरघोस यश संपादन करताना आपली परंपरा कायम राखली आहे. टक्केवारी वाढल्याने आता प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.