गोंदियामध्ये चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून भरधाव एसटी घसरुन झालेल्या अपघातात पाच प्रवासी किरकोळ जखमी झालेत. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मलपुरी ते गराडा दरम्यान रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे ही बस रस्त्यावरून घसरू लागली. चालकानं वेळीच कसंबसं नियंत्रण मिळवल्यानं ही गाडी रस्त्यावरून उतरली. यात ५ प्रवासी जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा आगाराची एमएच ४०–९८७४ या क्रमांकाची एसटी बस आपल्या पहिली फेरीसाठी सुकडीहून तिरोड्याकडं निघाली होती. पण मलपुरी ते गराडा दरम्यान रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे ही बस घसरली. यात राज बिसेन (वय १३, राहणार बाळापूर), समुर बिसेन (१३, डोंगरगाव), तारेंद्र रहांगडाले (१३, डोंगरगाव), हिमानी उके (१३, सुकडी) व अन्य एक असे पाच जण जखमी झाले. यावेळी एसटीत सुमारे 35 प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान अपघाताबाबत एस टी आगाराला माहिती देऊन देखील 2 तासांपर्यंत मदतीसाठी वाहन पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 
washim, kinhiraja village, accident, Two Wheeler Collides, Truck Two Killed, One Injured, Sambhajinagar Nagpur Highway,
वाशीम : बंद ट्रकचा अंदाज न आल्याने भीषण अपघात…. बापलेक जागीच ठार