29 November 2020

News Flash

एस. टी. बस-मालमोटारीची धडक; चार प्रवासी ठार, २१जण जखमी

बस व मालमोटारीची समोरासमोर जोराची धडक होऊन चार प्रवासी ठार, तर अन्य २१जण जखमी झाले. सोलापूर-धुळे महामार्गावर कळंब तालुक्यातील चोराखळी पाटीजवळ शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या

| January 10, 2015 01:57 am

 बस व मालमोटारीची समोरासमोर जोराची धडक होऊन चार प्रवासी ठार, तर अन्य २१जण जखमी झाले. सोलापूर-धुळे महामार्गावर कळंब तालुक्यातील चोराखळी पाटीजवळ शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

बसचालक दिलीप मारुती डोके (वय ४०, सुरतगाव, तालुका तुळजापूर), संतोष नागरगोजे (उपळाई, तालुका कळंब), नानासाहेब बाबासाहेब गोयेकर (भूम) असे तिघे जागीच ठार झाले, तर इंदुबाई मनोहर बेद्रे (वय ६०) या महिलेचा उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात दाखल केले असता मृत्यू झाला. जि.प. सदस्य नानासाहेब बळीराम जाधवर (वय ६०, रत्नापूर) यांच्यासह अन्य एक अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
जखमींमधील राष्ट्रवादीचे जि.प.चे सदस्य नानासाहेब जाधवर यांच्यासह तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. तुळजापूर आगाराची अहमदनगर-तुळजापूर (एमएच १४-बीटी २१६४) बस सकाळी सहाच्या सुमारास नगरहून तुळजापूरला निघाली होती. साडेनऊ वाजता येरमाळा बसस्थानकातून प्रवाशांना घेऊन ही बस उस्मानाबादच्या दिशेने निघाली. बसमध्ये चालक-वाहकासह २७ प्रवासी होते. येरमाळा येथून निघाल्यानंतर कळंब तालुक्यात चोराखळी पाटीजवळ आली असता समोरून भरधाव आलेल्या मालमोटारीने (आरजे ७ एपी ४११२) बसला धडक दिली. दोन्ही वाहने सुमारे १०० ते १५० फूट फरफटत गेली. अपघातात बसचा चक्काचूर झाला.
अन्य जखमींची नावे : शिवराम कुलकर्णी (वय ३५, येरमाळा, तालुका कळंब), सायराराव नवनाथ घोळवे (वय ४१, सोनारवाडी), कौसल्या बळीराम िशदे (वय ६५, अंदोरा), विजय बाबुराव वडगावे (वय ३०, मदनसुरी, तालुका निलंगा), राणी अगदेवार (वय ४०, निजामाबाद), अंगद दाशीदेव चव्हाण (वय ५५, पानगाव), अक्षय संदीप सोनवणे (वय १६, अहमदनगर), भगवान गोिवद नाईकवाडी (वय ५०, आनंदनगर, उस्मानाबाद), अभिमन्यू भोसले (वय ७०, शिवाजीनगर, उस्मानाबाद), बळीराम धोंडिबा िशदे (वय ७०, आंदोरा), प्रकाश जाधवर (वय ३२, सोनारवाडी), विश्वनाथ माधव घोळवे (वय ७०, सोनारवाडी), संतोष मधुकर खंडागळे (वय ३५, भूम), केशव शेंडगे (वय २४, येरमाळा), वामन रामिलग जाधव (वय २०, येरमाळा), बबन अर्जुन समुद्रे (वय १९, पानगाव), पंडित भालचंद्र पाटील (वय ४५, भूम), सुलभा संतोष खंडागळे (भूम). या सर्वावर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बसमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. काही जखमींना बाहेर काढताना बसचा पत्रा कापावा लागला. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. मालमोटारीचा चालक फरारी झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:57 am

Web Title: st bus truck accident four death
Next Stories
1 दुसऱ्याला वाचवा, तुम्ही वाचाल – डॉ. अभय बंग
2 रेल्वेच्या बैठकीकडे ९ खासदारांची पाठ
3 ‘लातूरकरांची बाजू मुख्यमंत्र्यांसमोर मांडेन’
Just Now!
X