22 February 2019

News Flash

कोल्हापुरात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, पत्रा कापून जखमींना काढलं बाहेर

अपघातात एका ६२ वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत

कोल्हापुरात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. कोल्हापूर – गगनबावडा रोडवर लोंघे येथे हा अपघात झाला. अपघातात ६२ वर्षीय महिला प्रवाशी बेबी बाळू मुल्लानी यांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. सकाळी नऊ वाजता हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयदुर्ग पुणे ही एसटी गगनबावड्याहून कोल्हापूरकडे येत होती. तर कोल्हापूर कोदे ही एसटी बस साळवनच्या दिशेने निघाली होती. दरम्यान लोंघे येथे या दोन्ही एसटी बसेसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये  20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही एसटी बसचा समोरील भाग एकमेकांत घुसला होता. जखमींना पत्रा कापून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. जखमींना सीपीआर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

First Published on July 13, 2018 10:34 am

Web Title: st buses accident on kolhapur gaganbavda road