News Flash

“एसटी बस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार”, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल? याची चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक

एसटीने देखील आपले उत्पनाचे नवनवे स्त्रोत विकसित करण्यावर भर दिला आहे

राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. या पार्शभूमीवर आज राज्याच परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना एक महत्वपूर्ण माहिती दिली. एसटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं

यावेळी अनिल परब म्हणाले ”जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेर देखील चालतील परंतु त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार आहेत.या संदर्भात एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल? याची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल. परंतु आता सरकारने ज्या काही गाइडलाईन्स दिलेल्या आहेत, त्यानुसार दोन्ही ठिकाणी एसटी चालतील फक्त या एसटी बस अत्यावश्यक सेवेसाठीच चालतील.”

२४ एप्रिलपासून सुरू होणार १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची नोंदणी! कशी असेल प्रक्रिया?

तसेच, ”त्या संदर्भात आता जे काही निकष आहेत, जिल्हाबाहेरील लोकांना येण्यासाठी किती दिवस विलगीकरणात ठेवयाचं? कशा पद्धतीने ठेवायचं? त्यांच्या हातावर शिक्के कसे मारायचे? या सगळ्या गोष्टींच्या निर्णयासाठी मंत्रालयाब बैठक होणार आहे. एसटी संख्या देखील कमी होईल, कारण नेहमीप्रमाणे एसटी चालणार नाहीत. गाइडलाईन्सचे तंतोतंत पालन केले जाईल. एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जर लोकं जाणार असतील, तर सरकारने म्हटल्यानुसार त्यांना हातावर शिक्के मारून १४ दिवस विलगीकरणात रहावं लागेल.”

विरोधकांच्या टीकेपेक्षा आम्हाला लोकांचे जीव वाचवणं महत्वाचं – परब
”विरोधक काय टीक करत आहेत, यापेक्षा लोकांचे प्राण वाचवणं आम्हाला जास्त गरजेचं आहे, त्यासाठी जे काही निर्बंध लावायचे आहेत, यामुळे जी काही रूग्णसंख्या वाढते आहे, ते घटवण्याचा हा प्रयत्न आहे. ब्रेक द चेन अंतर्गत हे काम सुरू आहे. त्यामुळे आता कोण काय बोलतं या पेक्षा लोकांना कुठलाही त्रास होणार नाही, हे पाहणं महत्वाचं आहे.” असं देखील यावेळी परब यांनी बोलून दाखवलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 1:16 pm

Web Title: st buses will run for essential services only msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: “ताटात आहे तेवढंच देणार ना,” प्रवीण दरेकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये जुंपली
2 केंद्रावर खापर फोडणं अयोग्य, तुम्ही काय करताय ते सांगा – प्रवीण दरेकर
3 Oxygen Shortage: राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे – राजेश टोपे
Just Now!
X