27 October 2020

News Flash

बोरिवली ते पुणे व्हाया मुंबई एअरपोर्ट !

खासगी टॅक्सी सेवेवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे प्रवाशांचे हाल

(संग्रहित छायाचित्र)

एसटी महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी बोरिवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ अशी वातानुकूलित सेवा देण्याचा विचार करतंय. मुंबई विमानतळावरील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी खासगी टॅक्सीशिवाय पर्याय नसतो,  खासगी टॅक्सी सेवेवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. अशा प्रवाशांच्या सोयीसाठी बोरिवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ अशी वातानुकूलित सेवा देण्याचा विचार केला जात आहे. यासाठी एसटी महामंडळाची मुंबई विमानतळ प्राधिकरणाशी चर्चाही सुरू आहे.

बंगळूरुच्या धर्तीवर मुंबई विमानतळाबाहेर बससेवा देण्याचा एसटीचा प्रयत्न आहे. विमानाने मुंबईत आलेल्यांना  पुण्यात जाणासाठी खासगी टॅक्सीशिवाय पर्याय नसतो. परिणामी टॅक्सीचालक अवाच्या सवा दर आकारतात त्यामुळे प्रवाशांचा मनःस्ताप होतो, पण पर्याय नसल्याने अधिक पैसे देऊन त्यांना खासगी टॅक्सीने प्रवास करावा लागतो. अशा प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईतून पुण्याला जाणाऱ्या वातानुकूलित एसटी सेवा मुंबई विमानतळाशी जोडण्याचा विचार केला जात आहे. शिवनेरीबरोबरच शिवशाही बसगाडय़ांचीही सुविधा मुंबई विमानतळाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना देण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले. सध्या एसटीकडे मोठय़ा प्रमाणात वातानुकूलित शिवशाही बसगाडय़ा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला एक शिवनेरी बस चालवल्यानंतर त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय मुंबई सेन्ट्रल, परळ, कुर्ला येथूनही पुण्यासाठी गाडय़ा सुटतात. त्यांचीही जोडणी राष्ट्रीय मुंबई विमानतळाला देण्यात येऊ शकते का, याची चाचपणी केली जात आहे.

“मुंबई विमानतळ प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा केली जात आहे. मुंबई राष्ट्रीय विमानतळाबाहेर एसटी गाडय़ा उभ्या करण्यासाठी जागा देण्यावरून चर्चा करण्यात आली. नेमक्या कोणत्या वेळेत एसटीची वातानुकूलित सेवा मुंबई विमानतळाबाहेर असावी याचा अभ्यास केला जात आहे. त्यानुसार एसटीची सेवा दिली जाणार आहे. बोरिवलीतून पुण्यासाठी वातानुकूलित शिवनेरीच्या बारा फेऱ्या होतात. यातील काही फेऱ्या विमानतळाला जोडण्याचा विचार केला जात आहे. याचबरोबर मुंबई विमानतळाबाहेर पडणारे प्रवासी पुण्याव्यतिरिक्त राज्यातील अन्य कोणत्या शहरात जातात, त्यानुसारही आणखी एसटीची वातानुकूलित सेवा देण्याचाही पर्याय शोधला जात आहे”, अशी माहिती एसटीच्या एका अधिकाऱ्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 11:56 am

Web Title: st new air conditioned service borivli to pune via mumbai airport sas 89
Next Stories
1 शिवसेनेशिवाय भाजपाचं सरकार टिकणार नाही : जयंत पाटील
2 सत्य नाकारुन भाजपाने ‘डेड लॉक’ निर्माण केला आहे शिवसेनेने नाही-राऊत
3 फक्त राऊत आणि राऊतच… लोकप्रियतेत उद्धव आणि आदित्य यांनाही धोबीपछाड
Just Now!
X