10 August 2020

News Flash

एसटीच्या प्रवासी भाड्यात शुक्रवारपासून वाढ

डिझेल दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाड्यात येत्या शुक्रवारपासून (२२ ऑगस्ट) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

| August 20, 2014 04:17 am

डिझेल दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाड्यात येत्या शुक्रवारपासून (२२ ऑगस्ट) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या साध्या, जलद, निमआराम सेवेत प्रति सहा किलोमीटरसाठी पाच पैशांनी भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ सरासरी ०.८० टक्के इतकी आहे. राज्य सरकारने मंजूर केलेल्या आपोआप भाडेवाढ सूत्रानुसार ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिवहन महामंडळाच्या निवेदनात म्हटले आहे.

भाडेवाढीची वैशिष्ट्ये

पहिल्या २७ किलोमीटरसाठी प्रवासी भाड्यात वाढ नाही
शहरी सेवेच्या प्रवासभाड्यात वाढ नाही
२२ ऑगस्टपूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या आणि २२ ऑगस्ट रोजी किंवा त्यानंतर प्रवास सुरू करणाऱया प्रवाशांकडून प्रवासावेळी फरक वसूल केला जाणार

काही महत्त्वाच्या मार्गावरील प्रवासी भाडे

पुणे – नाशिक (शिवनेरी) पूर्वी ५७५ वाढीनंतर ५८०
पुणे – नाशिक (शीतल) पूर्वी ४१५ वाढीनंतर ४२०
मुंबई – कोल्हापूर (निमआराम) पूर्वी ५६४ वाढीनंतर ५६८
मुंबई – रत्नागिरी (निमआराम) पूर्वी ५१३ वाढीनंतर ५१६
मुंबई – औरंगाबाद (निमआराम) पूर्वी ५४७ वाढीनंतर ५५०
मुंबई – महाड (निमआराम) पूर्वी २५७ वाढीनंतर २५८
पुणे – नागपूर (निमआराम) पूर्वी १०६० वाढीनंतर १०६६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2014 4:17 am

Web Title: st passenger fare hike from 22 august
टॅग Fare Hike,St
Next Stories
1 पाच मतदारसंघांसाठी आज मुलाखती
2 अमित शहांच्याच आदेशाने प्रवेश लांबणीवर?
3 अकलूजचे धवलसिंह मोहिते शिवसेनेत दाखल
Just Now!
X