News Flash

स्टँडअप कॉमेडियनकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान; मनसेनं ‘तो’ स्टुडिओच फोडला

सर्वच स्तरातून व्यक्त होतोय संताप

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका स्टँडअप शोदरम्यान जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जोशुआचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून अनेक शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दात टीका करत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यानंतर मनसेनंही या विरोध केला असून त्यांच्याकडून संबंधित स्टुडिओची तोडफोड करण्यात आली.

मनसेचे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून संबंधित स्टुडिओची तोडफोड करण्यात येत असल्याचं दिसत आहे. तसंच यश रानडे हे जोशुआला लिखित स्वरूपात माफीदेखील मागण्यास सांगत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यानंतर अग्रिमा जोशुआ हिनं लिखित स्वरूपात माफीनामाही सादर केला आहे. जोशुआच्या या व्हिडीओवरून सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्या मुलीने ज्या स्टुडिओत अपशब्द वापरले, तो स्टुडिओच मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी फोडला!

#MnsVruttantAdhikrut #मनसे #छत्रपतीशिवाजीमहाराज

Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Friday, 10 July 2020

एका स्टँडअप शोमध्ये अग्रिमाने मुंबईजवळ अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या विषयावरुन विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेखही केला. उपहासात्मक विनोद करण्याच्या नादात अग्रिमाने, “मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी इंटरनेटवरील सर्वात विश्वासार्ह साईटवर गेले आणि ती म्हणजे क्वोरा” असं म्हटलं. यापुढे तिने क्वोरावर या स्मारकाबद्दल काय काय लिहिलं होतं असं सांगताना, “मला तिथे एकाने लिहिलेला भलामोठ्या आकाराचा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे. यामुळं महाराष्ट्राचं भलं होईल असं या निबंधामध्ये लिहिलं होतं. तर दुसऱ्या एकाला वाटलं की इथ क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट सुरु आहे. म्हणून त्याने तिथे, या स्मारकात जीपीएस ट्रॅकरसुद्धा असणार स्मारकाच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जिच्या माध्यमातून अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्म केला जाईल. तर एकाने तिथे येऊन तुमची माहिती नीट करुन घ्या आणि शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असं लिहिलं होतं… मी याच शेवटच्या व्यक्तीला फॉलो केलं,” असं अग्रिमा म्हणाली.

अग्रिमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अग्रिमावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहिलं आहे. तसेच यासंदर्भातील एक व्हिडिओही सरनाईक यांनी सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या मुजोर कॉमेडियन अग्रिमा जोशुआला ताबडतोब अटक करण्यासंदर्भात मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. आपण या विषयांची अत्यंत गंभीर दखल घेऊन असल्या विकृत कॉमेडियन ला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे,” असं सरनाईक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 8:35 am

Web Title: stand up comedian joshua agrim chatrapati shivaji maharaj mns party worker yash ranade studio took apology jud 87
Next Stories
1 Video : येथे पाहा शरद पवार यांची मुलाखत
2 नांदेडमध्ये उद्यापासून टाळेबंदी
3 वणी येथे पुरात वाहून गेलेल्या तिघांचा मृत्यू
Just Now!
X