News Flash

‘नवे लक्ष्य’ टीमकडून महाराष्ट्र पोलिसांना सलाम, जुहू चौपाटीवर साकारलं भव्य वाळूशिल्प

युनिट-9 येतेय भेटीला

सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य जपत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडं. सण समारंभ असो किंवा शहरावर ओढावलेलं संकटं प्रत्येक परिस्थितीत महाराष्ट्र पोलीस सदैव नागरिकांचं संरक्षण करतात. गेल्या वर्षभरातही देशात करोनाच्या संकटानं लोकांची झोप उडवली होती यात महाराष्ट्राची अवस्था तर मोठी बिकट होती. मात्र अशातही महाराष्ट्र पोलीस जीवाची पर्वा न करता ऑन ड्युटी पाहायला मिळाली.

महाराष्ट्र पोलिसांची शौर्यकथा सांगण्यासाठी स्टार प्रवाहवर लवकरच ‘नवे लक्ष्य’ ही मालिका प्रक्षेकांच्या भेटीला येतेय. या निमित्तानं जुहू चौपाटी इथं भव्यदिव्य वाळुशिल्प साकारून स्टार प्रवाह वाहिनीच्या वतीने महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा देण्यात आला.तीन दिवसांच्या अथक मेहनतीनंतर हे भव्यदिव्य वाळुशिल्प साकार झालं. या भव्यदिव्य वाळुशिल्पाच्या उद्घाटनासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, बांद्रा पोर्ट इन्सपेक्टर मिलिंद सुर्वे यांनी खास हजेरी लावत या अनोख्या उपक्रमाचं कौतुक केलं.

पाच जिगरबाज पोलिसांनी उकल केलेल्या गुन्ह्यांची गोष्ट ‘नवे लक्ष्य’मधून आपल्या भेटीला येईल. नवं कथानक आणि नव्या टीमसह युनिट ९ ची टीम सज्ज झाली आहे. या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. या मालिकेबद्दल सांगताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, ‘नवे लक्ष्य नव्या रुपामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर येत आहे याचा आनंद आहे. पोलीस दलाविषयी आपल्या सगळ्यांनाच आदर आणि अभिमान आहे. महाराष्ट्र पोलिसांचं कौशल्य, चातुर्य आणि त्यांची कर्तव्यतत्परता वाखाणण्याजोगी आहे. वर्दीच्या आतला माणुस आणि त्याचं माणुसपण अधोरेखित करणारं असं हे नवे लक्ष्य आहे. येत्या 7 मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 6:04 pm

Web Title: star pravahs new serial nave lakshya tributes maharashtra police making sand art kpw 89
Next Stories
1 “मराठवाड्याच्या विकासाचा १२ आमदारांशी काय संबंध आहे?”
2 “सरकार टिकवण्यासाठीच हे सगळं सुरू”, पंकजा मुंडेंची सरकारवर परखड टीका!
3 ‘एमपीएससी’ने उमेदवारांसाठी सुरू केली नवीन सुविधा
Just Now!
X